आरटीओ कार्यालयात वकिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:14 IST2019-12-22T00:14:01+5:302019-12-22T00:14:16+5:30
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने कामानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानित केल्याचा आरोप करीत वकिलांनी शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

आरटीओ कार्यालयात वकिलांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने कामानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानित केल्याचा आरोप करीत वकिलांनी शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
अॅड. प्रमोद अंधारे हे २१ डिसेंबर रोजी अन्य एका व्यक्तीसोबत काही कामानिमित्त येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यावेळी तेथील लिपीक पी.एन.कºहाळे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा अॅड.अंधारे यांना कºहाळे यांनी अपशब्द वापरुन अपमानित केल्याच्या कारणावरून वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी आरटीओंच्या खुर्चीलाच निवेदनाची प्रत चिटकावली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये संबंधितावर योग्य ती कार्यवाही करुन न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी बहुसंख्येने वकील उपस्थित होते.