पुण्याच्या खून प्रकरणातील आरोपी धानोरा काळे येथे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:54+5:302021-03-27T04:17:54+5:30

पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांपूर्वी खून करून फरार झालेला आरोपी सचिन उत्तम तावरे (३२, हडपसर, पुणे) ...

Accused in Pune murder case arrested at Dhanora Kale | पुण्याच्या खून प्रकरणातील आरोपी धानोरा काळे येथे गजाआड

पुण्याच्या खून प्रकरणातील आरोपी धानोरा काळे येथे गजाआड

पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांपूर्वी खून करून फरार झालेला आरोपी सचिन उत्तम तावरे (३२, हडपसर, पुणे) हा पालम तालुक्यातील धानोरा काळे येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २६ मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

पुणे येथे प्रकाश देवरे याचा खून करून आरोपी सचिन तावरे हा फरार झाला होता. मागील पाच वर्षांपासून तो पंढरपूर, काशी, मथुरा या ठिकाणी राहून पोलिसांना चकवा देत होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींनी केली.

Web Title: Accused in Pune murder case arrested at Dhanora Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.