आरोपीला कोर्ट उठेपर्यंत कैद व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:16+5:302021-03-05T04:18:16+5:30

मास्क न वापरणाऱ्या ३४ जणांना दंड परभणी : शहरातील विसावा कॉर्नर, पाथरी रोड आदी भागात मास्क न वापरणाऱ्या ३४ ...

Accused imprisoned and fined till court rises | आरोपीला कोर्ट उठेपर्यंत कैद व दंड

आरोपीला कोर्ट उठेपर्यंत कैद व दंड

googlenewsNext

मास्क न वापरणाऱ्या ३४ जणांना दंड

परभणी : शहरातील विसावा कॉर्नर, पाथरी रोड आदी भागात मास्क न वापरणाऱ्या ३४ नागरिकांवर मनपाने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक राजू झोडपे, मेहराज अहमद, भारत देशमुख, मुकदम हत्तीअंबिरे, रमेश भराडे, आनंद राजगुरे यांच्या पथकाने राबवली.

ड्रोनद्वारे गावठाण मोजणी होणार

परभणी : सेलू तालुक्यातील नगर भूमापन होणे शिल्लक असलेल्या सर्व गावांच्या गावठाणातील मिळकतीची ड्रोनद्वारे मोजणी करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या अनुषंगाने ३ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे, पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक राम सिद्धमवार आदी उपस्थित होते.

उपाध्यक्षपदी अशोक मस्के यांची नियुक्ती

परभणी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड यांनी केली आहे. मस्के यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माधवराव हतागळे, सखाराम गायकवाड, कांता गवळी, अरुण रणखांबे, राधाकिशन जाधव, ॲड. दिनानाथ उबाळे आदी उपस्थित होते.

महिला दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता परभणी येथील गुरु माऊली आयुर्वेद येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संदीप चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Accused imprisoned and fined till court rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.