९२ टक्के नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:56+5:302021-03-25T04:17:56+5:30
जिल्ह्यात १ हजार २३० खाटा रिक्त परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात १ हजार २३० खाटा सध्या रिक्त ...

९२ टक्के नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यात १ हजार २३० खाटा रिक्त
परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात १ हजार २३० खाटा सध्या रिक्त आहेत. आरोग्य विभागाने २ हजार ४९३ खाटांचे नियोजन केले असून, त्यापैकी १ हजार २६३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये ८४ खाटा रिक्त आहेत, तसेच सेलू येथे उपजिल्हा रुग्णालयात २०, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात २० आणि तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात रिक्त खाटांचे प्रमाण अधिक आहे.
सोमवारी १८८० कोरोना चाचण्या
परभणी : सोमवारी जिल्ह्यात १ हजार ८८० नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या करण्यात आल्या. त्यात मनपा रुग्णालयात ४६६, जिल्हा रुग्णालयात १७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७६, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १७७ तपासण्या झाल्या आहेत. गंगाखेड तालुक्यात २७४, पूर्णा तालुक्यात १९२, सोनपेठ तालुक्यात १४५, पाथरी : १४९, सेलू ४०, मानवत ११६ आणि जिंतूर तालुक्यात २२८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.