शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दंड न आकारता सोडली जप्त केलेली ९ वाहने; शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:30 IST

तहसील कार्यालयाने या वाहनांची रीतसर माहिती पाथरी उपविभागीय कार्यालयास पाठवली होती.

ठळक मुद्देगौण खनिज चोरीचा गुन्हा नोंदतरीही सोडून दिली वाहने

- सत्यशील धबडगे 

मानवत : जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीची प्रकरणे गाजत असताना अवैध वाळू करताना जप्त केलेली ९ वाहने पाथरी येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्या लेखी आदेशावरुन दंड न आकारताच परस्पर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याने या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मानवत तालुक्यातील पार्डी, टाकळी, कोथाळा शिवारात असलेल्या दुधना नदीच्या पात्रातून  वाळूमाफिया ७ मार्च रोजी १० ते १२ ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करीत होते. याची कुणकुण तहसील कार्यालयाच्या पथकाला लागताच पथक नदीकाठी दाखल झाले. या पथकाने  नदीपात्रात वाळू खाली करून पळून जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या ४ ट्रॅक्टर  ट्रॉल्या ताब्यात घेतल्या. तर एक ट्रॅक्टरचे हेडही ताब्यात घेतले होते. जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लावण्यात आली होती. तहसील कार्यालयाने या वाहनांची रीतसर माहिती पाथरी उपविभागीय कार्यालयास पाठवली होती.

या माहितीच्या आधारे  उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ५  मे रोजी या वाहन मालकाना प्रति वाहन एक लाख रुपये दंड ठोठावून तो तातडीने भरण्यात यावा, अशी नोटीस बजावली होती; परंतु, नोटिसीचा काहीच परिणाम न झाल्याने २६ मे रोजी लेखी पत्र काढून दंडाची रक्कम ७ दिवसाच्या आत भरण्याचे आदेश दिले होते. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत वाहन मालकांनी ठोठावलेला दंड भरला नसतानाही तात्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी  ३१ जुलै रोजी एका वाहनाचा तर  उर्वरित दोन वाहनाचा  ३ आॅगस्ट रोजी लेखी आदेश काढला. या आदेशात वाहन चालकाचे म्हणणे मान्य करण्यात येत आहे आणि जप्त केलेले वाहन तात्कळ सोडण्यात यावे, असे आदेश तहसील कार्यालयाला दिले.

या आदेशात वाहनमालकाने दंड भरला की नाही, याचा उल्लेखही केलेला नाही. तसेच दंड भरल्या संदर्भात उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नाही. कुंडेटकर यांचे आदेश मिळताच तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त करून लावण्यात आलेली वहाने दंड न भरताच १० व १२  आॅगस्ट रोजी  सोडून देण्यात आली.  या ३ वाहनासह आणखी ६ वाहने नियमबाह्य पद्धतीने सोडल्याचे समजते. यामध्ये १० जून रोजी वांगी येथे पकडलेले  ३ ट्रॅक्टर व  २ वर्षांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या ३ टिप्परचाही समावेश आहे.

गौण खनिज चोरीचा गुन्हा नोंद ; तरीही सोडून दिली वाहनेकुंभारी तांडा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून त्याचा साठा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० जून रोजी पहाटे साडेपाच वाजता कारवाई करीत सुमारे ५० ब्रास वाळूसह ३ ट्रॅक्टर जप्त केले होते. या प्रकरणात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन काही वाहने ताब्यात घेतली होती. ही वहाने सोडविण्यासाठी वाहन मालक  न्यायालयात गेले होते. न्यायालयाने २४ जून रोजी महसूल विभागाने जरुरी असल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करून वाहने सोडून देण्याचे आदेश दिले होते. मात्र या वाहनांवर कोणत्याही प्रकाराचा दंड न आकारता ३ आॅगस्ट रोजी सोडून देण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना लेखी पत्राद्वारा प्राप्त झाले. या लेखी पत्रावर संबंधित वाहनचालकांनी दंड भरण्याची किंवा चलनाची माहिती नव्हती. न्यायालयाने सांगूनही वाहनांवर दंडात्मक कारवाई का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणासंदर्भात उपविभागीय कार्यालयाकडे कोणतीच कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

नियमबाह्य पद्धतीने वाहने सोडली आहेत, असे कोणाला वाटत असेल तर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी अपील करावे. -डॉ.संजय कुंडेटकर, तत्कालीन उपविभागीय अधिकारी 

टॅग्स :sandवाळूparabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग