८३९ संशयितांची दिवसभरात चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:21+5:302021-03-06T04:17:21+5:30

९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अहवाल येईनात परभणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना संशियतांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत ...

839 suspects tested throughout the day | ८३९ संशयितांची दिवसभरात चाचणी

८३९ संशयितांची दिवसभरात चाचणी

९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अहवाल येईनात

परभणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना संशियतांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असताना जिल्ह्यातील ९ आरोग्य संस्थांनी शुक्रवारी त्यांच्याकडील अहवाल पाठविले नाहीत. त्यामध्ये जिल्हास्तरीय रुग्णालय, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पूर्णा ग्रामीण रुग्णालय, पाथरी तालुक्यातील, पाथरी, सेलू, मानवत, जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सेलू उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे.

५८६ जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडेच

परभणी : जिल्ह्यातील ५८६ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब आरोग्य विभागाने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. याबाबतचा अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला मिळालेला नाही. तसेच प्रयोगशाळेने १४० जणांचे स्वॅब अहवाल नाकारले आहेत.

१ लाख ३२ हजार जणांची तपासणी

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत १ लाख ३२ हजार ४७२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ७२ हजार ७०७ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. तर ५९ हजार ७५६ जणांची ॲंटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.

रस्ता दुरुस्तीची आयुक्तांकडे मागणी

परभणी : शहरातील पारवा गेट ते सनझरी कॉलनीचा रस्ता तसेच अन्सार कॉलनी ते रसूल डीपी व रसूल डीपी ते पटेल डीपीपर्यंतचा रस्ता मुरूम टाकून रोलरने दबाई करावा, अशी मागणी लोकाश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मास्क न वापरणाऱ्या ४४ जणांवर कारवाई

परभणी : मास्कचा वापर न करणाऱ्या ४४ जणांवर मनपाच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई राजू झोडपे, मेहराज अहमद, भारत देशमुख आदींच्या पथकाने केली.

Web Title: 839 suspects tested throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.