ऑक्सिजनच्या ८१४ खाटा जिल्ह्यात रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:33+5:302021-05-31T04:14:33+5:30

कोरोना केअर केंद्रात केवळ १८६ रुग्ण परभणी : कमी लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात २४ कोरोना केअर केंद्र सुरू ...

814 vacancies in Oxygen district | ऑक्सिजनच्या ८१४ खाटा जिल्ह्यात रिक्त

ऑक्सिजनच्या ८१४ खाटा जिल्ह्यात रिक्त

कोरोना केअर केंद्रात केवळ १८६ रुग्ण

परभणी : कमी लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात २४ कोरोना केअर केंद्र सुरू केले आहेत. मात्र या केंद्रांमध्येही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोरोना केअर केंद्रात एकूण २ हजार ३७३ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १८६ रुग्ण उपचार घेत असून, २ हजार १८७ खाटा रिक्त आहेत. कोरोना रुग्णालयांमध्येही रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. शासकीय आणि खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये १ हजार ५९२ खाटांची सुविधा असून, ३७५ रुग्ण उपचार घेत आहेत. १ हजार २३७ खाटा रिक्त आहेत.

जिल्ह्यात ३ लाख ४१ हजार तपासण्या

परभणी : जिल्ह्यात काेरोनाच्या आनुषंगाने तपासण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत ३ लाख ४१ हजार ३२१ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात २ लाख ९१ हजार २५५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ लाख ४१ हजार ३१ अहवालांत २ लाख ८ हजार ४९४, तर रॅपिड टेस्टच्या १ लाख २९० अहवालांमध्ये ८२ हजार ७६१ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे १ लाख ८४८ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक असून, १४० जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.

सोमवारी १२ केंद्रांवर होणार लसीकरण

परभणी : सोमवारी शहरात लसीकरणासाठी १२ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मनपाने एकूण तीन केंद्रांची वाढ केली असून, या केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डची लस दिली जाणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी दिली. शहरातील ईनायतनगर, साखला प्लॉट, वर्मा नगर, दर्गा रोड, शंकर नगर, खंडोबा बाजार, खानापूर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जायकवाडी रुग्णालय व बाल विद्यामंदिर हायस्कूल नानलपेठ या केंद्रावर आतापर्यंत लसीकरण होत होते. सोमवारी कौसर हॉस्पिटल, हयात हॉस्पिटल, गव्हाणेरोड आणि करीम हॉस्पिटल या तीन केंद्रांची भर पडली आहे.

रेशन दुकानांवर वाढली गर्दी

परभणी : जिल्ह्यात केशरी रेशन कार्ड धारकांनाही मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले असून, शहरातील रेशन दुकानांवर लाभार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील ११ लाख ७६ हजार ९१९ लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्यांत गहू व तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. मे महिन्यासाठी ३५ हजार ३०८ क्विंटल गहू आणि २३ हजार ५३७ क्विंटल तांदळाचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे रेशन दुकानांवर मोफत धान्य उचलण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी होत आहे.

ढगाळ वातावरण; पावसाची हुलकावणी

परभणी : रविवारी दिवसभर शहर परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात उकाडाही वाढला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिली. उकाड्याने नागरिक त्रस्त होते.

Web Title: 814 vacancies in Oxygen district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.