अनुसूचित जातीसाठी ८, ओबीसीसाठी १६ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:20+5:302021-02-05T06:07:20+5:30

परभणी : तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यात अनुसूचित जातीसाठी ८ तर नागरिकांच्या मागास ...

8 seats reserved for Scheduled Castes and 16 for OBCs | अनुसूचित जातीसाठी ८, ओबीसीसाठी १६ जागा राखीव

अनुसूचित जातीसाठी ८, ओबीसीसाठी १६ जागा राखीव

परभणी : तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यात अनुसूचित जातीसाठी ८ तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. राज्य शासनाने या निवडणुका पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी येथील कल्याण मंडमप्‌ येथे तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, डॉ.वसीम शेख, एस.एम. लाठकर आदींच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जमाती महिलांसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी १६, खुल्या प्रवर्गासाठी ३४ आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सुटले आहे.

असे सुटले सरपंच पदाचे आरक्षण

अनुसूचित जाती : पेगरगव्हाण, देवठाणा, पोरजवळा, ताडलिमला, धर्मापुरी, सहजपूर जवळा, माळसोन्ना, पारवा.

अनुसूचित जाती (महिला) : पिंपळगाव ठोंबरे, पिंपरी देशमुख, बोरवंड बु., आर्वी, मुरूंबा, तामसवाडी, टाकळी कुंभकर्ण, वडगाव तर्फे टाकळी.

अनुसूचित जमाती : लोहगाव

अनुसूचित जमाती महिला : नांदखेडा

नागरिकांचा मागास प्रवर्ग : भोगाव, उमरी, वांगी, झाडगाव, इस्माईलपूर, धार, पान्हेरा/गव्हा, काष्टगाव, दैठणा, डफवाडी, वाडी दमई, संबर, उजळंबा, पांढरी, सनपुरी/सुलतानपूर, पाथरा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : साबा, पोखर्णी नृ., पेडगाव, जोडपरळी, टाकळगव्हाण, ताडपांगरी, राहाटी, आळंद (मोहपुरी), आलापूर पांढरी, आमडापूर, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, दुर्डी, समसापूर, बाभळी, मिरखेल, भारस्वाडा.

सर्वसाधारण : आंगलगाव, जांब, झरी, ब्राह्मणगाव, दामपुरी, एकुरखा तर्फे पेडगाव, इंदेवाडी, कैलासवाडी, किन्होळा, मांडाखळी, मांडवा, नांदगाव खु., पिंगळी कोथाळा, शिर्शी खु. सुरपिंपरी, उखळद, शहापूर, हसनापूर/तुळजापूर, आसोला, पिंगळी, सायाळा खटींग, तट्टूजवळा, रायपूर, बलसा खु., धसाडी, शर्शी बु., ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, डिग्रस, तरोडा/ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव, मांगणगाव, गोविंदपूर/सारंगपूर, पोरवड, धोंडी, नरसापूर.

सर्वसाधारण महिला : करडगाव, वरपूड, धारणगाव, सोन्ना, वडगाव सुक्रे, शेंद्रा, बोरवंड खु., परळगव्हाण, पिंपळा, ठोळा, पिंपळगाव सय्यदमियाँ, साटला, साडेगाव, आनंदवाडी, कोटंबवाडी, पिंपळगाव टोंग, टाकळी बोबडे, साळापुरी, बाभुळगाव, मटकऱ्हाळा, इठलापूर देशमुख, कुंभारी/कार्ला, हिंगला, मिर्झापूर, कौडगाव, आंबेटाकळी, जलालपूर/खानापूर तर्फे झरी, नागापूर, नांदापूर, नांदगाव बु. सावंगी खु. सिंगणापूर, कारेगाव.

Web Title: 8 seats reserved for Scheduled Castes and 16 for OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.