रस्ते बांधणीसाठी परभणी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपये मंजूर - बबनराव लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:01 IST2018-02-15T18:58:05+5:302018-02-15T19:01:08+5:30
राज्य आणि राष्ट्रीय रस्त्याची राज्यात सर्वाधिक दुरवस्था परभणी जिल्ह्यात झाली आहे. रस्ते रहदारी लायक ही राहिले नाहीत, त्या मुळे रस्ते बांधणी साठी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन लवकरच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडगरी यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी येथील कार्यक्रमात बोलताना दिली.

रस्ते बांधणीसाठी परभणी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपये मंजूर - बबनराव लोणीकर
पाथरी (परभणी ) : राज्य आणि राष्ट्रीय रस्त्याची राज्यात सर्वाधिक दुरवस्था परभणी जिल्ह्यात झाली आहे. रस्ते रहदारी लायक ही राहिले नाहीत, त्या मुळे रस्ते बांधणी साठी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन लवकरच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडगरी यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी येथील कार्यक्रमात बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री याच्या उपस्थितीत परभणी येथे समाधान शिबीर घेतले जाणार आहे. याच्या तयारीसाठी आज पाथरी येथील फुले कार्यालयात कार्यशाळा व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विठ्ठल राबदडे, प्रा पी डी पाटील, बाबासाहेब फले, जी प उपाध्यक्ष भावनताई नखाते, गणेशराव रोकडे, प्रफुल पाटील, अनिलराव नखाते, व्यंकटराव तांदळे, प स सभापती शिवकण्या ढगे, उपसभापती राजेश ढगे, ड्रा उमेश देशमुख, उद्धव नाईक, सुभाष आंबट, डॉ व्ही आर राठी, नानासाहेब वाकणकर, मधुकर नाईक यांच्या सह अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपजिल्हाधिकारी सी एस कोकणी, गटविकास अधिकारी बि टी बायस, तहसीलदार वासुदेव शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी लोणीकर यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना ची माहिती दिली. तसेच परभणी येथे होणाऱ्या समाधान शिबिरात किमान एक लाख गरजू लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे, रस्ते सुधारणासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी 7 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल अशी माहिती.