शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:41 AM

शहरी भाग हागणदारीमुक्त करण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले असले तरी वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र अधिकाºयांना कसरत करावी लागत आहे़ नागरिकांमधील उदासिनतेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवूनही वैयक्तीक शौचालयाचे कामकाज जिल्ह्यात ६३ टक्क्यांपर्यंतच पोहचले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी भाग हागणदारीमुक्त करण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले असले तरी वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र अधिकाºयांना कसरत करावी लागत आहे़ नागरिकांमधील उदासिनतेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवूनही वैयक्तीक शौचालयाचे कामकाज जिल्ह्यात ६३ टक्क्यांपर्यंतच पोहचले आहे़ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र नावाने नागरी स्वच्छता अभियान सुरू केले़ या अभियानांतर्गत शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हागणदारी मुक्तीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले़ परभणी जिल्ह्यात परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि १ नगर पंचायत अस्तित्वात आहे़ या सर्व शहरी भागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानामध्ये पाथरी आणि सोनपेठ या दोन नगरपालिकांनी उत्कृष्ट काम केले असले तरी इतर नगरपालिकांमध्ये मात्र उद्दिष्टपूर्तीसाठी ओढाताण होत असल्याचे दिसत आहे़ आठही शहरी भागांसाठी २१ हजार २७४ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ १८ नोव्हेंबरपर्यंत १३ हजार ४१७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ७ हजार ८५७ शौचालये बांधावयाचे बाकी आहेत़ जिल्हाभरात नागरी भागामध्ये सरासरी ६३ टक्के वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी शासनस्तरावरून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते़अनुदानाची रक्कमही प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ निधी उपलब्ध असेल तर कामे गतीने होण्यास काहीच अडचण नाही़ परंतु, अजूनही नागरी भागातील नागरिकांची मानसिकता बदलत नसल्याने स्वच्छता अभियानाला खीळ बसत आहे़ प्रशासन स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी दररोज वेगवेगळे उपक्रम राबवित असले तरी शौचालयाचे उद्दिष्ट गाठताना मात्र अधिकारी आणि कर्मचाºयांची ओढाताण होत असल्याचे दिसत आहे़