१०० पैकी ५१ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:33+5:302021-02-05T06:03:33+5:30

गंगाखेड तालुक्यातील आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सफाई कर्मचारी, आशा वर्कर आदी कर्मचाऱ्यांना कोरोना लस ...

51 out of 100 people were vaccinated | १०० पैकी ५१ जणांनी घेतली लस

१०० पैकी ५१ जणांनी घेतली लस

गंगाखेड तालुक्यातील आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सफाई कर्मचारी, आशा वर्कर आदी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या १०० जणांच्या यादीतील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बडे यांना कोरोना लस देऊन लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४ महिला व ७ पुरुष कर्मचारी। अशा एकूण ५१ जणांनी कोरोना लस घेतली आहे. यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, डॉ. सिरसञलवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधाक्षक डॉ. हेमंत मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, डॉ. पी.आर. चट्टे, डॉ. देवादास चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संतोष राजूरकर, मनोज नाव्हेकर, प्रशांत शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: 51 out of 100 people were vaccinated