जिल्ह्यातील वजनमापांचे मूल्यांकन करणे तसेच नूतनीकरण करण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केेले जात आहे. विशेष म्हणजे, परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयात केवळ १५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सहायक नियंत्रक भूमापक १, निरीक्षक ४, क्षेत्रीय सहायक ४, शिपाई ५ आणि लिपिकाचे एक पद मंजूर आहे. प्रत्यक्षात निरीक्षकाची २, क्षेत्रीय सहाय्यकाची ३ अशी ५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून दहा कर्मचाऱ्यांवरच या कार्यालयाचा कारभार पाहिला जात आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र पाहता कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांची संख्याही तोकडी पडत आहे. त्यामुळे कर्मचारी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने या कार्यालयासाठी वाढीव पदे मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे.
वैधमापन कार्यालयात कर्मचाऱ्यांची ५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST