५ अवैध गुटखा विक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST2020-12-17T04:42:53+5:302020-12-17T04:42:53+5:30
परभणी: पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने तालुक्यातील हत्तरवाडीसह शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सहा जणांविरोधात कारवाई करीत ...

५ अवैध गुटखा विक्रेत्यांना अटक
परभणी: पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने तालुक्यातील हत्तरवाडीसह शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सहा जणांविरोधात कारवाई करीत १ लाख ४४ हजार रुपयांच्या गुटख्यासह एक कार पथकाने १६ डिसेंबर रोजी जप्त केली. या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील हत्तरवाडी तसेच शहरातील महाराणा प्रताप चौकात अवैध गुटखा विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक बापूराव तडस, पोलीस उपनिरीक्षक जयंत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड आदींच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात हत्तरवाडी व शहरातील महाराणा प्रताप चौकातून गुटख्यासह एक कार व १ लाख ४४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी सर्जेराव शिंदे, राहुल शिंदे, सय्यद समशेर, विक्की उर्फ ज्ञानेश्वर सलगर, शायरोज खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.