परभणी जिल्ह्यात ४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:10+5:302021-03-06T04:17:10+5:30

परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी ४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दोघांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात कोरेानाबाधित ...

47 patients in Parbhani district; Death of both | परभणी जिल्ह्यात ४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यात ४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी ४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दोघांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरेानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामध्ये परभणी शहरात २२, सेलू व गंगाखेड तालुक्यात प्रत्येकी ६, पाथरी तालुक्यात ९, पूर्णा, पालम, मानवत व जिंतूर तालुक्यात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा व पुरुषाचा मृत्यू झाला. शुक्रवारी ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ७५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ८ हजार ३२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाला असून, विविध आरोग्य संस्थांमध्ये ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: 47 patients in Parbhani district; Death of both