जिल्ह्यात एसटीच्या ४४ बसेस विजेवर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:58+5:302021-09-02T04:38:58+5:30
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा कधी चालू तर कधी बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय ...

जिल्ह्यात एसटीच्या ४४ बसेस विजेवर धावणार
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा कधी चालू तर कधी बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच एसटी महामंडळालाही कोट्यावधी रुपयांचा फटका सहन करावा लागला. त्यातच आता डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे एसटी महामंडळ बस सेवा सुरळीत होऊन दोन महिन्यानंतरही पूर्वपदावर आलेली नाही. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार मागील दोन महिन्यापासून झालेले नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक बोजा खाली जात आहे. यावर उपाय म्हणून महामंडळाने आता इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालविला आहे. या बस जिल्ह्यात सुरू झाल्यात एसटी महामंडळाला त्याचा फायदा होईल.
४४ बसेस होणार दाखल
राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिकवर बसेस चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्याला ४४ बसेस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक विभाग नियंत्रकांकडून महामंडळाने याबाबत माहिती मागविली आहे.
खर्चात होणार बचत
विजेवर चालणाऱ्या एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे.तसेच बसच्या चार्चिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्चिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
वरिष्ठ स्तरावरून इलेक्ट्रिक बसेसबाबत विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. ही माहिती संकलित होताच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली जाईल.
- मुक्तेश्वर जोशी, विभाग नियंत्रक, परभणी.