४ रस्ते तब्बल चोवीस तासांनी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:58+5:302021-07-24T04:12:58+5:30
जिल्ह्यातील महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. जोरदार पावसात अनेक रस्ते बंद पडतात. याचा प्रत्यय जिल्ह्याला ...

४ रस्ते तब्बल चोवीस तासांनी सुरू
जिल्ह्यातील महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. जोरदार पावसात अनेक रस्ते बंद पडतात. याचा प्रत्यय जिल्ह्याला मागील एका महिन्यात २ ते ३ वेळेस आला. जिल्ह्याला जोडणारे व जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारे जवळपास १८ रस्ते गुरुवारी बंद झाले होते. यामुळे दळणवळण ठप्प पडले होते. काही रस्त्यांची कामे सुरु असल्याने तर काही रस्त्यावर पुलाची उंची कमी असल्याने हे मार्ग नेहमीच पावसाने बंद पडत आहेत. यात पालम-पुयणी, शिरपूर-सायाळा हे रस्ते १० ते १२ तासांनी सुरु झाले. परभणी-जिंतूर ८ तासांनी, परभणी-मानवत ५ तासांनी, पूर्णा-चुडावा ४ तासांनी व पूर्णा-ताडकळस १२ तासांनी, पाचलेगाव-जिंतूर ६ तासांनी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव २४ तास, राजवाडी-वालूर २४ तासांनी, मोरेगाव-वालूर १८ तासांनी, ढेंगळीपिपळगाव-मानवत ५ तासांनी, पाथरी-सेलू ३ तासांनी, सुनेगाव-धारखेड १८ तासांनी, वाघाळा-मुदगल १२ तास, चाटेपंपळगाव-बाभळगाव हे रस्ते १२ तासांनी सुरु झाले. यामुळे जिल्ह्यातील रस्ते जवळपास १ दिवसांनी सुरळित सुरु झाल्याचे दिसून आले.