भाजीपाला, किराणा दुकानांसाठी ४ दिवसांची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:17+5:302021-05-01T04:16:17+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली होती. राज्य शासनाने १५ मेपर्यंत संचारबंदी ...

4 day discount for vegetable and grocery stores | भाजीपाला, किराणा दुकानांसाठी ४ दिवसांची सूट

भाजीपाला, किराणा दुकानांसाठी ४ दिवसांची सूट

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली होती. राज्य शासनाने १५ मेपर्यंत संचारबंदी वाढविली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही या संचारबंदीच्या काळात १५मेपर्यंत वाढ केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढण्यात आला असून, किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने १ ते ४ मे या कालावधीत सकाळी ७ ते ११ यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर आस्थापना व दुकाने मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ मेपर्यंत सुनावण्या बंद

महसूल विभागाच्या वतीने विविध प्रकरणांमध्ये घेण्यात येणाऱ्या सुनावण्या १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पूर्वी या सुनावण्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यास १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

Web Title: 4 day discount for vegetable and grocery stores