कोरोनाच्या ३७३ रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:56+5:302021-03-26T04:17:56+5:30
मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी २ ...

कोरोनाच्या ३७३ रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू
मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी २ हजार ५०७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार ३३ अहवालांमध्ये २४८ पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे रॅपिड टेस्टच्या ४७४ अहवालांमध्ये १२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढलेली असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यातील ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर गुरुवारी ५ रुग्ण मृत्यू पावले. दोन दिवसात ११ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणारी १ महिला आणि खासगी रुग्णालयातील १ महिला व ३ पुरुष अशा एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ९९५ झाली असून, त्यापैकी १० हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३६९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, १ हजार ५८८ रुग्ण उपचार घेत आहेत.
परभणी शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याच प्रमाणे खासगी रुग्णालयात २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १ हजार २३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.