३७ कर्मचाऱ्यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:44+5:302021-02-06T04:29:44+5:30
परभणी : महानगरपालिकेतील ३७ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे. जिल्ह्यात कोरोना ...

३७ कर्मचाऱ्यांनी घेतली लस
परभणी : महानगरपालिकेतील ३७ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असून गुरुवारी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले. मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी सर्वप्रथम लस घेवून इतर सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक आयुक्त अलकेश देशमुख, नगररचना विभागाचे राजाभाऊ मोरे, बिल कलेक्टर अंबादास शिंदे, काकडे, आस्थापना विभागातील करुणा स्वामी, अनंत कौचीकवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लसीकरण करून घेतले आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत एकूण ३७ कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती देऊळकर, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, एम. एम. सॅम्युअल, सयय्यद इरफान, वैजनाथ कदम, निलेश जोगदंड, समन्वयक गजानन जाधव, ए.एन. टाले, टारफे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असून लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी स्वत: लस घेवून ही लस सुरक्षित आहे. तेव्हा सर्वांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.