जिल्ह्यात ३७ मुले शाळाबाह्य आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:26+5:302021-03-27T04:17:26+5:30
विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १० मार्च या कालावधीत ...

जिल्ह्यात ३७ मुले शाळाबाह्य आढळली
विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यातील ९ तालुक्यांत राबविण्यात आली. १ हजार १ ६८ पथकांच्या माध्यमातून राबविलेल्या या मोहिमेत ५ हजार ८४० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आपला अहवाल जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यात जिल्ह्यात एकूण ३७ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. आता या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाने दिली.
१०३ बालके गेली जिल्ह्याबाहेर
जिल्ह्यातील सर्वेक्षणात १०३ मुले विविध कारणांमुळे जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झाली आहेत. त्यात ४६ मुले व ५७ मुलींचा समावेश आहे. त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील ७, मानवत तालुक्यातील ५, सोनपेठ तालुक्यातील ११, पालम तालुक्यातील १, आणि सेलू तालुक्यातील ४७ मुलांचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांतून आली २१४ मुले
परभणी जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतून २१४ मुले आली आहेत. त्यात ११७ मुले आणि १०७ मुलांचा समावेश आहे. त्यात जिंतूर तालुक्यातील ९, पाथरी तालुक्यातील ८, पूर्णा तालुक्यातील १५, मानवत तालुक्यातील १४, सोनपेठ तालुक्यातील ९२, पालम तालुक्यातील ३२, सेलू तालुक्यातील ४४ आणि परभणी तालुक्यातील ७ मुलांचा समावेश आहे.