परभणी : सामूहिक विवाह सोहळ््यात ३२ जोडपे विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:42 IST2017-12-03T00:29:37+5:302017-12-03T00:42:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त यावर्षी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडपे विवाहबद्ध झाली़ येथील रोशनखान ...

परभणी : सामूहिक विवाह सोहळ््यात ३२ जोडपे विवाहबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त यावर्षी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडपे विवाहबद्ध झाली़ येथील रोशनखान मोहल्ल्यातील बारादरीमध्ये हा सोहळा पार पडला़
महंम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते़ विवाह सोहळा समितीने या उपक्रमात सातत्य ठेवले असून, यावर्षीचे हे ३१ वे वर्षे आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला़ मौलाना रफियोद्दीन आशरफी यांनी खुतबा-ए-निकाहचे पठण केले व नवदाम्पत्यासाठी दुवा मागितली़
यावेळी नव वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, इरफानूर रहेमान खान, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, नगरसेवक सचिन अंबिलवादे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, हमीद मलिक, डॉ़ अनिल कांबळे, विजय वाकोडे, अॅड़ जावेद कादर, जाकेर कुरेशी, इरफान मलिक यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते़
विवाह संपन्न झाल्यानंतर नव वधू, वरांसाठी विवाह समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले़ तसेच विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती़ उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला़
यशस्वीतेसाठी विवाह समितीचे अ़हाफिज, मोहम्मद ताहेर, प्रा़े़ हामिद हाश्मी, मौलाना रफियोद्दीन अशरफी, महम्मद गौस झैन, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक अन्वर खान, शेख शेरू, अशरफ साया, सिराजोद्दीन फारुखी, मौलाना अशफाक, सिकंदर कोठारी, सय्यद रफिक, अखिल इनामदार, रियाज अब्दुल गफार, मोहम्मद अय्युब, मुसा कुरेशी, जमीरोद्दीन काजी, हाफेज सय्यद निसार, मोहम्मद खाजा, अब्दुल बारी आदींनी प्रयत्न केले़