परभणीतून ३० वर्षीय इसम बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST2021-08-12T04:22:34+5:302021-08-12T04:22:34+5:30

शेख जोयफ शेख रफीक (३०, रा.सुभेदार नगर,परभणी) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शेख जोयफ यांची पत्नी फातिमा शेख ...

30-year-old Ism goes missing from Parbhani | परभणीतून ३० वर्षीय इसम बेपत्ता

परभणीतून ३० वर्षीय इसम बेपत्ता

शेख जोयफ शेख रफीक (३०, रा.सुभेदार नगर,परभणी) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शेख जोयफ यांची पत्नी फातिमा शेख यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. शेख जोयफ हे १ जुलै रोजी घरातून पाथरी येथील लाकडी कारखान्यावर कामाला जातो, म्हणून निघून गेले. मात्र ते अद्याप घरी आले नाही. यानंतर पत्नी फातिमा शेख यांनी पाथरी येथे लाकडी कारखान्यात विचारपूस केली असता येथे शेख जोयफ कामाला आला नाही असे सांगण्यात आले. यानंतर फातिमा शेख यांनी पाथरी व इतर ठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ते न आढळल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात ९ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. तपास पोलीस कर्मचारी एन.वाय.शेख करीत आहेत.

Web Title: 30-year-old Ism goes missing from Parbhani