शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ

By राजन मगरुळकर | Updated: June 26, 2024 16:04 IST

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे.

परभणी : शहर महापालिकेमार्फत सन २०२४-२५ या वर्षाकरिता मालमत्ता कराचे मागणी बिल वाटप सुरू आहे. यामध्ये जे मालमत्ता धारक एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करतील, अशा मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. या आर्थिक वर्षात बुधवारपर्यंत एकूण तीन हजार ३०० मालमत्ताधारकांनी या पाच टक्के सूट योजनेचा लाभ घेतला आहे. सदर योजनेसाठी अजून तीन दिवस बाकी आहेत.

शहरातील मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या मालमत्ता कराचे मागणी बिल पत्रक वाटप केले जात आहे. शहरात जवळपास ७५ हजारहून अधिक मालमत्ता धारक आहेत. एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षात आजपर्यंत तीन हजार मालमत्ता धारकांनी सदरील वर्षभराची रक्कम अदा करून या सूट योजनेचा लाभ घेतला आहे. आता गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे शेवटचे तीन दिवस योजनेसाठी बाकी आहेत.

याद्वारेही करू शकता कराचा भरणामालमत्ता करासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर मालमत्ता कराची इ-मागणी बिल व ते भरण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन लिंक परभणी एमसीडॉटओआरजीवर जाऊन विविध पर्यायद्वारे तसेच मागणी बिलावरील क्यूआरकोडचा वापर करून आणि एसएमएसद्वारे आलेल्या लिंकचा वापर करून सदरील रक्कम भरणा करावी. याशिवाय महापालिकेचे वसुली लिपिक प्रभाग समिती येथील कॅश काउंटरवर सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मनपाचे आवाहनमालमत्ता कर भरण्यासाठीच्या सुविधा सुविधाचा लाभ घेऊन ३० जूनपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करून चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सुट्टीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकरMuncipal Corporationनगर पालिका