९० टक्के नुकसान होऊनही दिले हेक्टरी २८०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:04+5:302020-12-12T04:34:04+5:30
पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे ...

९० टक्के नुकसान होऊनही दिले हेक्टरी २८०० रुपये
पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघाळा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकाच्या काढणी पश्चात ९० टक्के नुकसान झाल्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाईन तक्रार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामा केला. यावेळी ९० टक्के नुकसान झाल्याचे प्रतिनिधीने मान्यही केले. मात्र प्रत्यक्ष खात्यावर मदत देताना विमा कंपनीने सोयाबीन पिकाला प्रति हेक्टरी २८०० रुपयांप्रमाणे नाममात्र पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार वाघाळा येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर पद्माकर मोकाशे, इंद्रजीत घुंबरे, बालाप्रसाद मुंदडा, स्नेहल मोकाशे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.