परभणी जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:58+5:302021-05-08T04:17:58+5:30
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी २३ रुग्णांचा ...

परभणी जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १५ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७, जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मयत खासगी दवाखान्यातील आहेत. शुक्रवारी दिवसभरात ६२० रुग्णांची नोंद झाली तर ६८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ६ जणांचा मृत्यू झाला असून, ७ हजार ७६३ रुग्ण विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४४, जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये २४७, रेणुका मंगल कार्यालय येेथे १०७, अक्षदा मंगल कार्यालय येेथे १३२ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये ६ हजार ४०६ जण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.