शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ओरिसातून आणलेला २३ किलो गांजा परभणीत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ओरिसा तसेच आंध्र प्रदेशच्या सीमेवरील सिरेलू येथून परभणीत विक्रीसाठी आणलेला २२ किलो ७५७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : ओरिसा तसेच आंध्र प्रदेशच्या सीमेवरील सिरेलू येथून परभणीत विक्रीसाठी आणलेला २२ किलो ७५७ ग्रॅम गांजा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शहरातील बसस्थानक परिसरात जप्त केला आहे. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात विक्री करण्यासाठी काहींनी गांजा आणल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरुन पथकातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोध मोहीम राबवली. गांजा घेऊन आलेेले काहीजण बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली. यावेळी १ लाख १३ हजार ७८५ रुपये किमतीचा २२ किलो ७५७ ग्रॅम गांजा, एक दुचाकी, एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. विकास संजय दाभाडे आणि युवराज रुक्माजी भदर्गे (रा. परतूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओरिसा तसेच आंध्र प्रदेशच्या सीमेवरील सिलेरु येथून हा गांजा आणल्याची माहिती या दोघांनी दिली. याप्रकरणी विकास संजय दाभाडे, युवराज रुक्माजी भदर्गे, आंध्र प्रदेशातील डंबरु, प्रकाश काळे, युसूफ शेख, शफू, दीपक, प्रदीप फुलमाळे आणि एका महिला आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक बापुराव दडस, उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, अरुण कांबळे, दीपक मुंढे, आरेफ कुरेशी, कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, कर्मचारी आईटवाड, लटपटे, वाघमारे, गायकवाड, रामा कदम यांनी ही कारवाई केली.

हैदराबादमार्गे आरोपींचा प्रवास

परभणीत गांजासह पकडलेल्या आरोपींनी हैदराबाद, विशाखापट्टनम्‌, नांदेड, परतूरमार्गे परभणीपर्यंतचा प्रवास केला. परभणी शहरात हा गांंजा विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता, असे पोलिसांनी सांगितले.