जिल्ह्यात कोरोनाच्या २२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:40+5:302021-05-13T04:17:40+5:30

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २२ नागरिकांचा १२ मे रोजी मृत्यू झाला असून, ४५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ...

22 corona patients die in district | जिल्ह्यात कोरोनाच्या २२ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाच्या २२ रुग्णांचा मृत्यू

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २२ नागरिकांचा १२ मे रोजी मृत्यू झाला असून, ४५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटली असली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच असल्याने नागरिक धास्तावले आहेत.

मागच्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गाने नागरिकांना त्रस्त केले आहे. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या हा संसर्ग जिल्ह्यासाठी हानिकारक ठरत आहे. मध्यंतरीच्या काळात रुग्ण संख्या घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. बुधवारी एकूण २२ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये आठ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी प्रथमच पूर्णा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मृत्यू पावलेल्या २२ रुग्णांमध्ये १६ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे.

बुधवारी आरोग्य विभागाला १ हजार ७४२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार २५२ अहवालांमध्ये ३२३ आणि रॅपिड टेस्टच्या ४९० अहवालांमध्ये १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ४१६ झाली असून, त्यापैकी ३८ हजार ६३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ७५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ४ हजार ७०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३७, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३२, अक्षदा मंगल कार्यालयात ७४, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये २६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ३ हजार ५८१ रुग्णांवर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत.

Web Title: 22 corona patients die in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.