महापालिकेतील २१ रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:16+5:302021-06-02T04:15:16+5:30
मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचे आदेश काढले आहेत. १ जून रोजी महापौर अनिता सोनकांबळे, ...

महापालिकेतील २१ रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम
मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचे आदेश काढले आहेत. १ जून रोजी महापौर अनिता सोनकांबळे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, सहायक आयुक्त महेश गायकवाड यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युनियन नेते के. के. आंधळे, नगरसेवक सचिन देशमुख, आनंद मोरे, सावंत, अनंत कोलसेकवार, राजकुमार जाधव, अभिजित कुलकर्णी, सलीम कच्छी, करण गायकवाड आदींची उपस्थिती होती. कायम केलेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत कायम केलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीचे भान राखून कार्य करावे, अशी अपेक्षा महापौर अनिता सोनकांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या कारकीर्दीत महापालिकेतील १०६ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून, ते सेवेत कायम झाले आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली, असे सोनकांबळे म्हणाल्या. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने महापौर अनिता सोनकांबळे, सहायक आयुक्त महेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.