अवैध वाळू वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:44+5:302021-02-05T06:03:44+5:30
स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी २ फेब्रुवारी रोजी गस्तीवर असताना यांना मिर्झापूर ते झरी रस्त्यावर रात्री ११.२५च्या सुमारास १ लाल ...

अवैध वाळू वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले
स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी २ फेब्रुवारी रोजी गस्तीवर असताना यांना मिर्झापूर ते झरी रस्त्यावर रात्री ११.२५च्या सुमारास १ लाल रंगाचे हेड असलेला टिप्पर येताना दिसला. या टिप्परला थांबवून पाहणी केली असता, त्यात अवैध वाळू आढळून आली. वाहन चालकाकडे परवाना व कागदपत्रे नव्हती. टिप्पर ताब्यात घेऊन परभणी ग्रामीण ठाण्यात लावण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक आकाश सुभाष खिल्लारे व टिप्पर मालक संदीप खोंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत परभणी तालुक्यातील जोड परळी येथे बुधवारी रेतीने भरलेला टिप्पर घेऊन चालक अशोक वाघमारे हा झरीकडे येत होता. झरी-मिर्झापूर रस्त्यावरील कॅनलवर वाहन थांबवून तपासले असता, त्यात अवैध वाळू दिसून आली, तसेच चालक पळून गेला. हे वाहन जप्त करून ग्रामीण ठाण्यात आणण्यात आले आहे. याबाबत चालक अशोक वाघमारे व टिप्पर मालकाविरुद्ध पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र नारायण खुपसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.