१८२५२ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST2021-03-13T04:31:38+5:302021-03-13T04:31:38+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा ...

१८२५२ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून १०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुसऱ्या टप्प्यात तालुका प्रशासनाकडून ९ कोटी ८ लाख ४१ हजार ५५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान १८ हजार २०० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये बोरी व परिसरातील २३ गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने अनुदान वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन शाखा व्यवस्थापक एस.पी. घनवटे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांत संताप
१२ मार्चपासून बँकेच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप सुरू आहे; मात्र बँकेला अपेक्षित रोकड उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान न उचलताच परतावे लागत आहे.