परभणी जिल्ह्यात १८ गावांचा तुटला संपर्क ; १० मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:14+5:302021-07-15T04:14:14+5:30
मंगळवारी रात्री जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गळाटी व लेंडी ...

परभणी जिल्ह्यात १८ गावांचा तुटला संपर्क ; १० मंडळात अतिवृष्टी
मंगळवारी रात्री जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीला पूर आल्याने १० गावांचा संपर्क तुटला आहे. तर गंगाखेड तालुक्यातील सुनेगावजवळ इंद्रायणी नदीला पूर आल्याने या भागातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, जिल्ह्यात २४ तासांमध्ये १० मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. पालम मंडळात सर्वाधिक १७४.५, चाटोरी १२८.५, परभणी ६७.३, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ९६.३, पिंपळदरी ६५, पूर्णा तालुक्यातील ताडकळस ६६.८, सेलू तालुक्यातील कुपटा ९४.८, सोनपेठ ८३.८ आणि शेळगाव मंडळात ६७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून, मोरेगाव- वालूर, येलदरी- इटोली, पालम -ताडकळस आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक होत असल्याने प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.