रुग्णांच्या सेवेत आणखी १७० ऑक्सिजन बेड दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:17+5:302021-04-16T04:16:17+5:30

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य संस्थांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांवर उपचार ...

170 more oxygen beds admitted in patient service | रुग्णांच्या सेवेत आणखी १७० ऑक्सिजन बेड दाखल

रुग्णांच्या सेवेत आणखी १७० ऑक्सिजन बेड दाखल

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य संस्थांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १७० ऑक्सिजन बेड तयार केले असून, या बेडवर आता रुग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या १५० ऑक्सिजन उपलब्ध असून, वाढीव १७० बेडस मिळून जिल्ह्यामध्ये ३२० ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले आहेत. याशिवाय सेलू, गंगाखेड, जिंतूर आणि बोरी या चार ठिकाणी प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेड याप्रमाणे २०० ऑक्सिजन बेडस् येत्या दोन दिवसांमध्ये सुरू केले जाणार असल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.

आणखी दोन सीसीसी वाढविले

परभणी शहरात आणखी दोन कोरोना केअर सेंटर्स वाढविण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम येथे २०० आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २०० खाटा तयार करण्यात आल्या असून जिल्ह्यातील खाटांची संख्या आता ४०० ने वाढणार आहे. विशेष म्हणजे, कल्याण मंडपम येथील कोरोना केअर केंद्रामध्ये काही बेड ऑक्सिजने सज्ज ठेवले जाणार असल्याचेही मुगळीळकर यांनी सांगितले.

२२ के. एल. ऑक्सिजन उपलब्ध

जिल्ह्यात ५० के एल ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता आहे. त्यापैकी केवळ २२ के एल ऑक्सिजन जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता २० के एल एवढी असून या प्रकल्पात १०.७ के एल, आयटीआय येथील ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता २० के एल असून तेथे ४.१ के एल आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १० के एल अशी क्षमता आहे. त्या ठिकाणी ७.६ के एल ऑक्सिजन उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याशिवाय आरोग्य विभागाकडे २५ ड्युरो सिलेंडर असून त्यातील २२ सिलेंडर भरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचे १ हजार जम्बो सिलेंडर उपलब्ध आहेत. परंतु त्यातील केवळ ३२२ सिलेंडर्समध्येच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. उर्वरित सिलेंडर रिक्त आहेत. वाढीव ऑक्सिजन मागविण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कुठे किती ऑक्सिजन उपलब्ध

रुग्णालय क्षमता उपलब्ध साठा

जिल्हा रुग्णालय २० के एल १०.७ के एल

आयटीआय २० के. एल ४.१के एल

जि प इमारत १० के. एल ७.६ के एल

Web Title: 170 more oxygen beds admitted in patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.