१३७७ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST2020-12-14T04:31:21+5:302020-12-14T04:31:21+5:30
पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी दहावी प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीयस्तरावर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी परभणी ...

१३७७ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा
पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी दहावी प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीयस्तरावर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी परभणी शहरातील ३ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नानलपेठ भागातील बाल विद्यामंदिर शाळेत ५५७, कै. रावसाहेब जामकर विद्यालयात ५०७, सुमनताई गव्हाणे विद्यालयात ३१३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बाल विद्यामंदिर येथे ५३१ विद्यार्थी उपस्थित होते. तर २६ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर कै.रावसाहेब जामकर विद्यालयात ४९० विद्यार्थी उपस्थित तर १७ विद्यार्थी अनुपस्थित होते. सुमनताई गव्हाणे विद्यालयात ३०० विद्यार्थी उपस्थित तर १३ विद्यार्थी अनुपस्थित होते. १३७७ पैकी १३२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.