१३ सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:24+5:302021-02-10T04:17:24+5:30

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यापैकी ५ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या होत्या, तर ३४ ग्रामपंचायतींसाठी ...

13 Elections of Sarpanch and Deputy Sarpanch | १३ सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी

१३ सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यापैकी ५ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या होत्या, तर ३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयात सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. सरपंचपदाच्या निवडीसाठी ८ ते १२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी होणार आहेत. यासाठी १३ पीठासन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सायखेडा येथे सरपंचपदी राजेश्वर रावसाहेब कदम व उपसरपंचपदी हौसाबाई बाबूराव उजगरे यांची निवड करण्यात आली. खडका येथे सुमन भगवान खरात यांची सरपंच तर आशाताई ज्ञानोबा यादव यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. डिघोळ येथे राधाबाई शिंगाडे यांची सरपंच, तर अजयकुमार विजयकुमार देशमुख यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. कान्हेगावच्या सरोज रामेश्वर मोकाशे यांची सरपंच म्हणून, तर आशा माणिक कोरडे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. निमगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्योती तुकाराम भालेकर यांची, तर शालूबाई माणिक धोत्रे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. थडी उक्कडगावच्या सरपंचपदी अनुराधा पुरी, तर उपसरपंच म्हणून राधा गोविंद भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. गवळी पिंपरी येथे सरपंच म्हणून दत्तात्रय पांचाळ व उपसरपंच म्हणून दीक्षा संतोष बोकरे यांची निवड करण्यात आली. लासिना येथे सोमित्रा परांडे यांची सरपंच, तर उपसरपंच म्हणून परमेश्वर शिवाजी परांडे यांची निवड करण्यात आली आहे. वाडी पिंपळगावच्या सरपंचपदी सिंधूबाई वारकरे यांची तर उपसरपंचपदी रंजना माधव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. यासाठी १३ पीठासन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.

Web Title: 13 Elections of Sarpanch and Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.