बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:50+5:302021-06-05T04:13:50+5:30
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना ...

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने प्रारंभी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर दहावीपाठोपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बारावीनंतर पदवी व इतर अभ्यासक्रमाची प्रक्रिया कशी राहणार आहे, याबाबत अद्याप शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात सापडले आहेत. बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे अनेक विद्यार्थी विदेशातही शिक्षणासाठी जातात. त्यामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांना शासन परीक्षेचे गुणांकन कसे देणार? पुढील पदवी व अन्य अभ्यासक्रमास प्रवेश कोणत्या निकषाच्या आधारे देणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
बारावीनंतरच्या संधी
बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीपीटीएच आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन, रेडिओथेरपी, न्युरॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्यूजन टेक्निशियन अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
तसेच बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, कृषी, फॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.