शुक्रवारी काढली १२५ अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST2021-02-13T04:17:58+5:302021-02-13T04:17:58+5:30

वसमत रस्त्यापासून ते उघडा महादेव मंदिर मार्गे कॅनालकडे जाणाऱ्या रिंग रोडवर वसमत रस्त्याजवळ अतिक्रमणे झाली होती. १०० फूट रुंदीच्या ...

125 encroachments removed on Friday | शुक्रवारी काढली १२५ अतिक्रमणे

शुक्रवारी काढली १२५ अतिक्रमणे

वसमत रस्त्यापासून ते उघडा महादेव मंदिर मार्गे कॅनालकडे जाणाऱ्या रिंग रोडवर वसमत रस्त्याजवळ अतिक्रमणे झाली होती. १०० फूट रुंदीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्याची नोटीस मनपा प्रशासनाने अतिक्रमणधारकांना दिली होती. मात्र त्यानंतरही अतिक्रमणे हटविली नसल्याने ११ फेब्रुवारी रोजी जेसीबी यंत्राच्या साह्याने अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. गुरुवारी मोहीम राबविल्यानंतरही अनेक अतिक्रमणे हटविणे शिल्लक असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपासूनच पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभरात ६ घरे, काही दुकाने पानटपऱ्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशावरुन शनिवारी देखील ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केेले. पथक प्रमुख प्रदीप जगताप, देविदास जाधव, महेश गायकवाड, शहर अभियंता वसीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नगर रचनाकार किरण फुटाणे, रईस खान, आरेस खान, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, शेख शादाब, नयनरत्न घुगे, मेहराज अहमद, श्रीकांत कुरा, वीज विभाग प्रमुख सोहेल, उद्यान विभाग प्रमुख पवन देशमुख, अथर खान आदीनी मोहिमेत सहभाग नोंदविला. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, अजय पाटील यांनी या भागात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

शनिवारी देखील मोहीम

शनिवारी देखील या भागात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी आपले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

८ जेसीबी, २ पोकलँडचा वापर

शुक्रवारी अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाच्या १२५ कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे ८ जेसीबी, २ पोकलॅण्ड मशीन, ३ ट्रॅक्टर आणि ४ टिप्परचा वापर केल्याची माहिती मनपाने दिली.

Web Title: 125 encroachments removed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.