जिल्ह्यात १२२० रुग्ण; १९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST2021-04-23T04:19:02+5:302021-04-23T04:19:02+5:30
परभणी : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने धास्ती निर्माण झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ...

जिल्ह्यात १२२० रुग्ण; १९ जणांचा मृत्यू
परभणी : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने धास्ती निर्माण झाली आहे. गुरुवारी दिवसभरात १ हजार २२० नव्या रुग्णांची नोंद झाली असून, १९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मागच्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जिल्हावासीय चिंतेत आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येने दोन दिवसांपासून एक हजारांचा पल्ला गाठला आहे. २२ एप्रिल रोजी आरोग्य विभागाला ४ हजार २९१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ३ हजार ६१३ अहवालांमध्ये ९३० आणि रॅपिड टेस्टच्या ६७८ अहवालांमध्ये २९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जिल्ह्यात बाधित रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही चिंतेचे झाले असून, गुरुवारी तब्बल १९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयातील ७ आयटीआय रुग्णालयातील सहा आणि खासगी रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये सात महिला आणि १२ पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ हजार ३० झाली असून, त्यापैकी २१ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ७२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या ६ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २८०, अक्षदा मंगल कार्यालयात १६०, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ५ हजार ३२ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत.
४०५ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात गुरुवारी ४०५ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. प्रशासनाने या रुग्णांना सुटी दिली आहे.