शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डा गावात तापीच्या साथीने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:24 IST

खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

पाथरी (परभणी) : खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून त्यांनी रुग्णांची रक्ताची नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. 

हदगाव बु प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत खेर्डा येथे चिकन गुनिया व तापीच्या रुग्णांची अचानक वाढ झाली. यानंतर गावातील रुग्ण पाथरी येथे खाजगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचारासाठी दाखल होत आहेत. ५० पेक्षाही जास्त रुग्ण तापिने पाडीत आहेत. यातच श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीस ताप आल्यानंतर मंगळवारी पाथरी येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी रात्री 11.30 च्या सुमारास तिला परभणी येथे घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर आज सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी खंदारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र हदगाव चे वैधकीय अधिकारी डॉ. जाधव यांचे चार जणांच्या  पथक गावात दाखल झाले. याचसोबत परभणी येथील मलेरिया विभागाचे अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पथकासह गावात दाखल झाले. 

रक्त नुमने घेतले गावात घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी   डेंगू , चिकन गुनिया, आणि मेंदू ज्वर यासाठी रक्त नमुने घेतली आहेत. तीन दिवसात याचा अवहाल प्राप्त होईल. तसेच श्रद्धा या मृत मुलीच्या रक्ताचे नमुने औरंगाबाद येथे तपासनीस पाठवल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. खंदारे यांनी दिली. 

गावात तापीचा उद्रेक तापीच्या रुग्णाची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने खेर्डा गावात 'तापीचा उद्रेक' झाल्याचे घोषित केले आहे. गावात 15 दिवस आरोग्य विभागाचे पथक कार्यरत राहणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरzpजिल्हा परिषदparabhaniपरभणी