बीटीचे १० लाख पाकिटे
By Admin | Updated: May 14, 2014 01:12 IST2014-05-14T00:36:46+5:302014-05-14T01:12:12+5:30
जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बीटी कापसाचे ९ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली
बीटीचे १० लाख पाकिटे
परभणी : जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बीटी कापसाचे ९ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी प्रस्तावित कापूस लागवडीचे क्षेत्र १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. शेतकर्यांना खरीप हंगामामध्ये बीटी-१ व बीटी-२ या कापसाच्या वाणाची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाने तब्बल ९ लाख ५० हजार बीटी कापसाचे पाकिटाची मागणी केली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये बीटी कापसाचे पाकेट उपलब्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून परभणी जिल्ह्यात बीटी-१ व बीटी- २ या कापसाचे पाकिटे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावर्षीही शेतकर्यांना कृषी दुकानांवर रांगा न लावता बीटी कापसाचे पाकिटे उपलब्ध होण्यासाठी नियोजन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी) खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टरवर होणार पेरा परभणी जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी प्रस्तावित ५ लाख ३८ हजार २१० हेक्टरवर पेरा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस लागवडीचे क्षेत्र म्हणजे १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. त्या खालोखाल सोयाबीन १ लाख ८० हजार हेक्टर, तूर ८५ हजार हेक्टर, उडीद ८ हजार हेक्टर, मूग ३५ हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, मका २ हजार हेक्टर, बाजरी २ हजार हेक्टर असे पेर्याचे क्षेत्र आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणार्यांवर होणार कारवाई खरीप हंगाम अवघ्या २० ते २५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कृषी विभागाने खरीप हंगामातील सर्व बियाणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे कृषी दुकानदार बियाणांची कृत्रिम टंचाई करतील, अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाचे जी.एस.हांडे यांनी दिली.