परभणीत अडीच हजार रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:30 IST2018-01-08T00:30:08+5:302018-01-08T00:30:19+5:30
आ़डॉ़राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील गजानननगर भागात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़

परभणीत अडीच हजार रुग्णांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आ़डॉ़राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील गजानननगर भागात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़
प्रभाग ४ मधील पारदेश्वर विद्यालयात रविवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वरोग निदान शिबीर पार पडले़ आ़डॉ़राहुल पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले़ या प्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय गाडगे, ज्ञानेश्वर पवार, मननपाचे गटनेते चंद्रकांत शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, आयएमएचे अध्यक्ष डॉ़राजू सुरवसे, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ़ संजय मुंडे, डॉ़ विक्रम पाटील, डॉ़ अमोल भालेराव, अनिल डहाळे, बाळराजे तळेकर, विशू डहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ शिबिराचे संयोजक राहुल खटींग व मकरंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ या शिबिरात अस्थिव्यंग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, दंत चिकित्सा, नेत्र रोग आदी आजारांच्या अडीच हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ तसेच शून्य ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना सुवर्णप्राश डोस पाजण्यात आला़ अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप गिराम, शरद हिवाळे, विजय काळे, बाबू फुलपगार, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, रणजीत मकरंद, प्रसाद चांदणे, राहुल कांबळे, प्रशांत शिंदे आदींनी प्रयत्न केले़