शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

ऐन पंचविशीत तरुण का करताहेत हेअर ट्रान्सप्लान्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:37 IST

इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमनं हेअर ट्रान्सप्लाण्ट केलं यात मोठी बातमी काय? हल्ली सगळेच करतात! पण बेकहॅम अनेक वर्षे सांगत होता की टक्कल पडलं तर पडलं, त्यात काय? एजिंग ग्रेसफुली व्हायलाच हवं. मात्र बदलत्या स्टायलिश वार्‍यात त्यानंही आपल्या डोक्यावर नवे केस उगवून घेतले. त्यानिमित्तानं पुन्हा केशारोपणाची चर्चा आहे. आपल्याकडेही ऐन विशीत तरुण मुलं केशारोपण करू लागलीत. काय आहे हा ट्रेण्ड? डोक्यावरचे केस इतके त्रासदायक का झालेत?

ठळक मुद्देकेशारोपण प्रक्रिया ही उपचारपद्धती आहे; पण ते करताना फसवणूक होण्याचाही धोका आहेच!

- स्नेहा मोरेलंबे घने काले बाल एकेकाळी मुलींच्या सौंदर्याचे निकष होते. पण काळ बदलला, फेअरनेस क्रिम फक्त मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही मागे लागल्या. गोरं आणि स्मार्ट, हॅण्डसम व्हा म्हणून मुलांच्या मागे लकडा लागला. ते कमीच होतं त्यात शेकडो शाम्पू, कंडिशनर, तेल आले. ब्यूटी ट्रिटमेण्ट आल्या आणि खांद्यावरच्या डोक्यापेक्षाही डोक्यावरचे केस जास्त मोलाचे ठरूलागले. केस गळणं ही तरुण मुलांच्या आयुष्यात जीवन मरणाची समस्या ठरू लागली. आणि ती समस्या ‘जीवन-मरणाची’ आहे हे ही जाहिराती आणि बाजारपेठेनंच तरुण मुलांवर इतकं बिंबवलं की सामान्य तरुण मुलंच कशाला थेट सेलिब्रिटीही या कम्पलशनला बळी पडतात. अलीकडेच मोठा वाद झाला तो इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या हेअर ट्रान्सप्लाण्टमुळे. तो 2012 साली म्हणाला होता की, मी टकला झालो तर झालो, त्यात काय, वयाप्रमाणं टक्कल पडतंच. उगीच मी खोटे केस लावणार नाही; पण 2018 उजाडताच त्यानंही हेअर ट्रान्सप्लाण्ट केलंच. माध्यमांनी ते फोटो नुकतेच छापले. त्याचं भांडं फोडलं. आणि त्यानिमित्तानं पुन्हा जगभरात केशारोपण याविषयाची चर्चा सुरू झाली. तसंही आपल्याकडेही शाहरूख खानने केशारोपण केल्याची चर्चा मध्यंतरी होतीच. त्यात आता बाजारपेठेची आकडेवारी समोर येत आहे. 2023 र्पयत 23881 मिलिअन अमेरिकन डॉलर्स इतकी उलाढाल या केशारोपण क्षेत्रात होईल, असा अंदाज आहे.मुद्दा असा की गेल्या काही वर्षात सौंदर्याचे ठोकताळे एवढे पक्के झाले की ते नाही म्हणजे आपण सुंदर नाही असा न्यूनगंड मुलींसह मुलांच्याही मानगुटीवर बसला. परिणाम म्हणून तरुण मुलं आपल्या रंगरूपाविषयी अधिक सतर्क झाले. इतके की एका टप्प्यावर दुनियेला वेड लावणार्‍या बेकहॅमलाही केशारोपण करावंसंच वाटलंच. मुद्दा काय, डोक्यावरचे केस डोक्याला ताणही देऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणून आता तरुण मुलांचं केस प्रत्यारोपण करण्याचं प्रमाण वाढत आहे असं याविषयातले तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. पूर्वी चाळिशीत केस प्रत्यारोपणासाठी प्रौढ माणसं येत असत, आता मात्न हे वय अध्र्यावरच आलं आहे. केस गळण्याचं प्रमाण हे विशीत वाढलेलं असून, त्यावर काही पर्यायच दिसला नाही तर अनेक तरुण मुलं  सहजरीत्या केस प्रत्यारोपणाचा पर्याय स्वीकारत आहे. एकूण  ‘बाल बाल बचे’ अशी लढाई सुरू होताना दिसते आहे. 28 वर्षाच्या साहिलने नुकतीच नवीन नोकरी सुरू केली होती. त्याच्या डोक्यावर एक टक्कलाचा छोटासा पॅच होता. ऐन तारुण्यात आपल्याला टक्कल पडतंय या भावनेनं मी हादरलो. आपलं तारुण्यच जात चाललंय असं वाटायला लागलं.  असं वाटणं कदाचित मेलोड्रामॅटिक किंवा उथळ वाटू शकेल, पण ही वस्तुस्थिती आहे’ असं निराश झालेला साहिल म्हणतो. त्यामुळे त्यानं हेअर ट्रान्सप्लाण्टचा मार्ग निवडलाय. तो सांगतो, ‘ही ट्रिटमेण्ट करण्यापूर्वी माहितीतली काही उत्पादन वापरली होती, पण त्याचा काही रिझल्ट आला नाही, आणि या सगळ्यात माझे केस आणि आत्मविश्वास दोन्ही गमावून बसलो. त्यानंतर अखेर मी हा पर्याय निवडला, आता या ट्रिटमेण्टच्या दुसर्‍या टप्प्यात आहे, रिझल्ट बरे दिसू लागल्याने समाधान आहे असंही तो आवजरून सांगतो.’खरं तर डोक्यावरचे केस कमी-जास्त असले किंवा टक्कल असलं तरी त्याचा थेट संबंध आपल्या व्यक्तिमत्त्वाशी लावू नये हे खरंच. पण करिअर करताना न्यूनगंड वाटणं ते टक्कल आहे म्हणून लग्नच न ठरवणं ते इतरांनी टकलू म्हणून चिडवणं हे सारं तरुण मुलांना फार त्रासदायक वाटू लागलं आहे. त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय म्हणून केसांवर उपचार ते हेअर ट्रान्सप्लाण्ट आता सुरू झाला आहे.मात्र हे सारं करताना योग्य उपचार आणि सल्लाही मिळायला हवा. अन्यथा बस-ट्रेनमध्ये चिकटलेल्या जाहिरातींपासून ते अवास्तव स्वप्न दाखवणार्‍या जाहिरातींर्पयत कशाही मार्फत फसवणूक होण्याचा धोकाही अटळ आहे.तो धोका टाळून या केशारोपणाकडे कसं पाहायला हवं याविषयी आणि या नव्या उपचारपद्धतीविषयी फेशिअल प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोमे सांगतात, ‘केस प्रत्यारोपणात तरुण मुलांचं प्रमाण 60 टक्के आहे, तर मुलींचं प्रमाण 40 टक्के आहे. सध्याचा काळ हा अतिशय धावपळीचा आणि ताणाचा आहे. जवळपास प्रत्येकजण कसल्या ना कसल्या ताणाचा बळी आहे. झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम शरीरातील संप्रेरकांवर होतो. गेल्या 3-4 वर्षात हे प्रमाण खूप वाढलं तर आहेच पण केस गळण्याचा आणि टक्कल पडणार्‍यांचा वयोगटही खूप कमी होत चालला  इतक्या तरुण वयात गळणार्‍या केसांमागे बदलती जीवनशैली, जीवनसत्त्व आणि पोषकमूल्यांचा अभाव, विविध प्रकारचे डाएट, स्टेरॉइडसचं वाढतं प्रमाण ही मुख्य कारणं आहेत. शिवाय वाढता ताण-तणाव हासुद्धा यातील महत्त्वाचा भाग आहे. तरुण मुलींमध्ये पीसीओडीची समस्या हे केस गळतीचं मोठं कारण दिसून येते. त्यामुळे हार्मोन्सचं बिघडलेलं संतुलन, केस अतिच पातळ होणं किंवा प्रचंड गळणं यासाठी तरुण मुलीही केशारोपणाचा पर्याय निवडतात. मात्र वाटलं नि  केलं असं न करता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे उपचारही करायला हवेत.आता तर काय जगभरात पुन्हा बेकहॅमच्या केशारोपणाचे चर्चे आहेत, त्या घाईत अनेकजण आपल्या डोक्यावरच्या केसांचा नव्यानं विचार करतीलच.फॅशनच्या साथीची लागण हल्ली अधिक वेगानं होते, त्याचेच हे परिणाम.( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्ती आरोग्य वार्ताहर आहे.)*****

केस प्रत्यारोपणाच्या उपचारपद्धतीकोणत्या?

फॉलिक्यूलर युनिट ट्रान्सप्लाण्ट

ही पद्धत आधीपासून वापरली जाते. या पद्धतीत डोक्यावरच्या केसांसोबत त्वचादेखील काढली जाते. सामान्यपणे डोक्याच्या मागच्या बाजूचे केस काढून प्रत्यारोपित केले जातात. मागच्या बाजूवरील केसांसोबत त्वचा काढली जाते. त्यानंतर त्या केसांना त्वचेपासून वेगळे केले जाते. ज्या जागी टक्कल पडले असेल त्याजागी त्या केसांचे प्रत्यारोपण केलं जातं. डोक्याच्या ज्या भागातून केसांसोबत त्वचा वेगळी केली जाते त्याजागी टाके घातले जातात. त्या प्रकारात डोक्यावर व्रण राहतात. या पद्धतीचा खर्च हजारोंच्या घरात असतो. **

फॉलिक्यूलर युनिट एक्ट्रॅक्शन

यामध्ये प्रत्येक केसाचे ग्राफ्ट स्वतंत्नपणे काढले जाते. त्यामुळे मागील बाजूस व्रण राहत नाहीत. प्रत्यारोपित करण्यात येणार्‍या भागात प्रत्येकी एक एक असे रोवले जातात. येथे कुठलेही टाके येत नाही व जखम लवकर भरून येते, तसेच डोनर जागा कळून येत नाही. ज्यात एका युनिटमध्ये 2 ते 3 केस असतात. एका युनिटमध्ये जेवढे जास्त केस असतील तेवढा चांगला रिझल्ट मिळतो. ग्रेड 1,2,3 र्पयत ट्रान्सप्लाण्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यापुढच्या स्टेजमध्ये असणार्‍या लोकांना ट्रान्सप्लाण्ट करण्याची गरज भासत नाही. केस प्रत्यारोपण म्हणजे तुमच्या केसांचे रिडिस्ट्रिब्युशन केले जाते. म्हणजे तुमच्या डोक्याच्या मागचा केसांचा लूक बदलत नाही. ही प्रत्यारोपण करण्याची पद्धत सारखीच असते. फक्त केस डोक्यावरून काढण्याच्या या वेगळ्या पद्धती आहेत. तसेच हे केस प्रत्यारोपण केल्याचा रिझल्ट तिसर्‍या-चौथ्या महिन्यानंतर अणि पूर्ण रिझल्ट एका वर्षात दिसतो. हे केस कायमस्वरूपी लावले जातात. या एका शस्त्रक्रियेसाठी जवळपास 6 ते 7 तास लागतात. शस्त्रक्रियेवेळी फक्त लोकल अ‍ॅनेस्थेशिया दिला जातो. ही शस्रक्रिया करण्यासाठी लाखभर रुपयांचा खर्च करावा लागतो.**डॉ. गूगल नकोच !

सध्या कोणत्याही आजारावर डॉ. गूगल हे सहज उपलब्ध होते. म्हणजे यूटय़ूबवर डझनभर व्हिडीओ पाहिले किंवा गूगलवरील सर्फिग करून एखादे उत्पादन वापरले की आपल्या समस्येचं उत्तर सापडतं असं अनेकांना वाटतं. त्यामुळे खास करून ही यंग जनरेशन बर्‍याच पद्धती आणि उत्पादन ट्रायआउट करून मग काहीच रिझल्ट येत नाही त्यावेळी डॉक्टरचा दरवाजा ठोठावतात. परिणामी, काही प्रकरणात त्या वेळेस उशीर झालेला असतो. म्हणून कोणतीही उपचारपद्धती असो वा उत्पादन त्याला वैज्ञानिक आधार असल्याशिवाय स्वीकारू नये हे उत्तम.

**हानिकारक उत्पादनांपासून सावधान

सध्या बाजारात बरीच चिनी, रशियन आणि कोरिअन पद्धतीची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. अगदी कमी किमतीत इंटरनेट किंवा कोणत्याही मार्केटमध्ये ही सहजरीत्या उपलब्ध होतात. मात्न ही उत्पादनं वर-वर रिझल्ट देणारी असली तरी शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम करणारी असतात. यामुळे बर्‍याचदा कमी किमतीत-कमी वेळात रिझल्ट आणण्यासाठी ही उत्पादने वापरली जातात. मात्न यामुळे स्वास्थ्यास धोका निर्माण होतो. शिवाय आयुष्यभर औषधोपचारही करावे लागतात. याप्रमाणे काही बोगस संस्थाही केस प्रत्यारोपणाच्या ट्रिटमेण्ट देतात. मात्न अशा संस्थांवर अंकुश ठेवणारी कोणतीही यंत्नणा आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतर्‍वर प्रयोग करताना नीट विचार करून उपचार घेतले पाहिजेत.