कलीम अजिम
कोरोना व्हायरसच्या संक्रमणासंदर्भात मार्चमध्ये ब्रिटनमधून आलेल्या दोन बातम्या जगभराचं लक्ष वेधून घेतलं.कोरोनाच्या दाहकतेची कल्पना युरोपियन आणि अन्य देशांना आली. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना विषाणूचा संसर्ग झाल्याची ही बातमी होती.आज घडीला ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊन 110 दिवस अर्थात तीन महिने उलटले आहेत. पण अजूनही तिथली परिस्थिती सावरली नाहीये. विरोधकांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान पुरेशा उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहेत. दुसरीकडे स्थानिक वृत्तापत्नानंदेखील सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत.हा लेख लिहित होतो तेव्हा जे वृत्त हाती आलं (11 मे) त्यावेळी ब्रिटेनमध्ये मृतांची संख्या 31,855 झालेली होती, तर 2,16,525 व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली होती. या आठवडय़ात रविवारीच एका दिवसात 269 लोक कोरोनाला बळी पडले.मृतांच्या संख्येत अमेरिकेनंतर ब्रिटनचा दुसरा क्रमांक. अजून संसर्ग परिस्थिती आटोक्यात नसताना सरकारनं लॉकडाउन उठवण्याचं धोरण स्वीकारलं. सर्व काही आलबेल असल्याचं भासवत पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाला लॉकडाउन उठविण्यासंदर्भात सल्ले व सूचना मागविल्या. या निर्णयामुळे अनेकजण गोंधळात पडले. या धोरणाचा सर्वच स्तरांतून विरोध सुरू झाला.स्वत: कोरोना आजारातून बरे होत महिनाभराच्या विश्रंतीनंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 6 मे रोजी संसदेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते कीयर स्टैमर यांनी या रोगराईशी लढण्यास ब्रिटेनला अपयश आल्याचा ठपका ठेवला. लॉकडाऊन लावण्यास उशीर केला, त्यामुळे टेस्टला विलंब झाला. त्यातून संक्रमित लोकांची ओळख पटविण्यासही उशीर झाला. ब्रिटेननं पीपीई सप्लाय करण्यासही उशीर केला, असा आरोपही सरकारवर करण्यात आला.उत्तरादाखल पंतप्रधानांनी आर्थिक डबघाई पाहता लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात दबाव असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. परिणामी त्यांना संसद व संसदेबाहेर प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. सरकारी धोरणाची ट्विटरवर खिल्ली उडवली गेली. धोरणाची टर उडवत अनेक तरुण नागरिकांनीही सरकारला गंभीर होण्याचा सल्ला दिला.या संदर्भात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा एक फोटो ट्विटरवर चांगलाच गाजला.फोटोत जॉन्सन आपल्या ऑफिसकडे पायी जात आहेत. त्यांच्या हातात कॉफीचा कप असून, ते एका अन्य व्यक्तीसोबत बागेतून चालत आहेत. दोघांनीही सुरक्षेच्या कुठल्याच शर्थी पूर्ण केल्याचं या फोटोत दिसत नाही. फोटोत एकूण चार व्यक्ती आहेत. त्यातला एकजण पंतप्रधानांना बोट उगारून सल्ला देतोय, तर दुसरा हसतोय.नेटिझन्सनी या फोटोवरून पंतप्रधानांना चांगलंच सुनावलं. देशात काही लोकांना स्पेशल प्रीव्हिलेज मिळत आहेत, अशा स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे, अशा उपहासात्मक पोस्ट टाकल्या गेल्या. हजारो मिम्स तयार झाले. तरु ण ब्रिटिश नागरिक तर जॉन्सन यांचा समाचार घेत होते. सोशल मीडियात त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.आता लॉकडाऊन उठवल्यास मृतांचा आकडा वाढेल, अशी भीती ब्रिटनचे शास्रज्ञ व तज्ज्ञ व्यक्त करत आहेतच. दुसरीकडे गेल्या दोन आठवडय़ापासून लॉकडाऊनचं काटेकोर पालन होत नसल्याच्या तक्र ारी येत होत्याच. अखेर रात्नी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या भाषणात लॉकडाऊन 1 जूनर्पयत कायम राहील, अशी घोषणा केली.
**त्यात दुसरीकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना आणि धूम्रपानासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. धूम्रपान केल्यानं त्या धुरातून दुस:या व्यक्तीला संक्र मणाचा धोका होऊ शकतो. स्मोकिंगमुळे श्वसननलिकेवर परिणाम होतो, त्यातून हा आजार बळावण्यास मदत होते, असं जागतिक आरोग्य संस्थेनं जाहीर केलं आहे.त्यामुळे त्याला जोडून डेली मेल या ब्रिटिश वर्तमानपत्रने एप्रिल अखेरीस यासंदर्भात विविध 26 सर्वेक्षणाचे आकडे देत दावा केलाय की, ब्रिटनमध्ये उपचारासाठी येणारे 14.4 टक्के पेशंट स्मोकर आहेत. आकडेवारी सांगते की, चीनमध्ये तब्बल 52 टक्के लोक स्मोकिंग करतात. चीनमध्ये अधिक काळ कोरोना टिकून राहण्यास स्मोकिंग हे मोठं कारण असू शकतो, असा अंदाज या तज्ज्ञांनी वर्तवला आहे.या भीतीतून जगभरातील लोक मोठय़ा संख्येने सिगारेट सोडत आहेत. त्यात तरु णांचं प्रमाण लक्षणीय आहे. ब्रिटेनमध्ये हा आकडा जवळपास 24 लाखांच्या घरात आहे तर तीन लाख तरुणांनी कायमचं स्मोकिंग सोडलं असून, पाच लाख लोकांनी आपली सिगारेटची तलफ दाबून ठेवल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळते.या संदर्भात एका अन्य रिपोर्ट्समधून धक्कादायक आकडेवारी बाहेर आली. जगभरात अनेक लोक घरात कोंडून आहेत. त्यांच्यात एकटेपणा व फ्रस्ट्रेशनचं प्रमाण वाढलं आहे. स्टे होम आणि क्वॉरण्टाइनमुळे तरुणांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण वाढलं आहे.बीबीसीनं प्रकाशित केलेला एका रिपोर्ट सांगतो की, ब्रिटेनमध्ये कोरोना मृतांमध्ये आशियायी नागरिक लक्षणीय आहेत. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशी वंशाच्या व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. गो:या लोकांच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट असल्याचं रिपोर्ट सांगतो. राहण्याची तोकडी जागा, संसाधनांची कमतरता, मागचे आजार हे तीन प्रमुख कारण याला जबाबदार असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)