आपला कपिल शर्मा होतोय का?

By Admin | Updated: April 5, 2017 18:01 IST2017-04-05T18:01:43+5:302017-04-05T18:01:43+5:30

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?

Is your Kapil Sharma going? | आपला कपिल शर्मा होतोय का?

आपला कपिल शर्मा होतोय का?

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?

महिनाभरापूर्वी कुणी म्हटलं असतं की, तुझा कपिल शर्मा होतोय..तर आपण किती आनंदानं बेभान झालो असतो..कपिल शर्मा इतकी लोकप्रियता, त्याचं ग्लॅमर, त्याचा पैसा, त्याचं यश, बड्या वर्तुळातली त्याच्याच नावाचे चर्चे, त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आतुरलेले बडे सेलिब्रिटी..हे असं काही आपल्याला मिळालं तर कुणाला नको होतं?पण आज काय चित्र आहे?
सोशल मीडीयात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजमध्ये यासंदर्भात अत्यंत उद्बोधक चर्चा पहायला मिळते आहे. ती रंजक तर आहेच, पण अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे..आजच्या इन्स्टण्ट जगात लोकप्रियता आणि लोकांचं वेडं प्रेम हे किती क्षणिक असतं याचं ते एक उदाहरणही आहे..
म्हणूनच आपण जेव्हा आपलं करिअर करतो, यश मिळावं म्हणून मेहनत करतो तेव्हा अवतीभोवतीच्या या गोष्टीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं..
म्हणूनच तर निनावी फॉरवर्ड होत असलेला एक इंग्रजी मेसेज ७ पॉईण्टसमध्ये कपिलच्या निमित्तानं काही लाईफस्किल्स, सॉफ्ट स्किल्स सांगताना दिसतो..त्याचा हा काहीसा भावानुवाद..
१)उगवलेला सूर्य मावळतोच, त्यामुळे आपण खूप वेगानं उंच जातोय तर आपण खालीही येवू कधी ना कधी याचं भान ठेवायला हवं.
२) सतत आपल्या टीम मेट्सचा, सहकाऱ्यांचा, सोबत्यांचा अपमान करुन तुम्ही यश नाही कमावू शकत आणि कमावलं तरी ते टिकवून नाही ठेवू शकत
३) ज्या टीमबरोबर आपण यश कमावलं ती टीम मोडूतोडू नये.
४)लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, हे कायम लक्षात ठेवावं.
५) दारू आणि इगो हे दोन्हीही तब्येतीसाठी वाईटच, हे कायम लक्षात ठेवलेलं बरं..
६) आपली रेप्युटेशन, प्रतिष्ठा आणि नाव कमावण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागते, पण गमवायला एक क्षण पुरेसा असतो.
७) आणि तुम्ही तुमची प्रतिष्ठा गमावली तर त्यामागोमाग तुम्ही बाकी सारंच गमावून बसता?

Web Title: Is your Kapil Sharma going?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.