तुम्ही फक्त नंबर द्या.!

By Admin | Updated: May 30, 2014 10:12 IST2014-05-30T10:12:58+5:302014-05-30T10:12:58+5:30

‘तुम्ही ती माहिती छापलीये ना, त्याबद्दल अजून माहिती पाहिजे? मला करायचाय स्वयंरोजगार, तुमच्याकडे कोणते स्वयंरोजगार अव्हेलेबेल आहेत, त्यातलाच एखादा मी करीन म्हणते.’

You just give the number! | तुम्ही फक्त नंबर द्या.!

तुम्ही फक्त नंबर द्या.!

>‘तुम्ही ती माहिती छापलीये ना, त्याबद्दल अजून माहिती पाहिजे? मला करायचाय स्वयंरोजगार, तुमच्याकडे कोणते स्वयंरोजगार अव्हेलेबेल आहेत, त्यातलाच एखादा मी करीन म्हणते.’
**
‘ते’ आहेत ना, त्यांचा नंबर द्या.ते जे काम करतात ते मला भारी वाटतं, तेच मी करीन त्यात काही अवघड नाही.फक्त नंबर द्या.’
**
‘‘वेबसाइट दिली आहे ना तुम्ही, ती काही पहायला मला वेळ नाही. जमतही नाही, त्यापेक्षा सरळ मला फोन नंबर द्या, सगळी माहितीच मेल करा..’’
****
‘‘ दरवर्षी करिअर स्पेशल अंक सुरू झाले की, हे असे फोन आम्ही हमखास घेतो. यंदाही तेच. मागच्या आठवड्यात स्वयंरोजगार विशेषांक प्रसिद्ध झाल्यांनतर अनेक फोन आले. अनेक जणांचे प्रश्न अत्यंत जिज्ञासू होते. बर्‍याच जणांनी तर आवर्जून सांगितलं की, ‘मला वाट सापडली होतीच, हे वाचून आता मी अधिक आत्मविश्‍वासानं काम करीन.’
पण बहुसंख्य फोन मात्र, ‘तुम्ही फक्त नंबर द्या.’ असा हट्ट करणारे.
नंबर कशाला?
- तर ज्यांनी स्वयंरोजगार उभा केला आहे त्यांच्याशी बोलून तसंच, डिट्टो तेच काम सुरू करण्यासाठी मदत मागण्यासाठी. कितीही समजावलं की, त्यांनी आपापले स्वयंरोजगार यशस्वी करून दाखवले कारण त्यांनी आपल्या आसपासची गरज हेरली. त्या गरजेप्रमाणं स्वयंरोजगार उभा केला. म्हणून ते यशस्वी झाले. अशी गरज तुमची तुम्हाला हेरावी लागेल, आयता रेडिमेड कॉण्टॅक्ट, रेडिमेड माहिती आणि त्याहून रेडिमेड स्वयंरोजगार तुम्हाला कोण देणार?
तेच फोननंबर आणि पत्त्यांचं. ते द्याच असा आग्रह. कशासाठी? तर आम्हाला तसाच डिट्टो प्रोजेक्ट ते लोक तयार करून देतील का, या मागणीसाठी.
त्यात अनेक जण तर उच्चशिक्षित, डबल ग्रॅज्युएट. 
पण वेबसाइटवर जाऊन आपल्याला हवी ती माहिती शोधणं, संपर्काचे क्रमांक-पत्ते शोधून काढणं हे काम त्यांना जवळजवळ अशक्यच वाटतं. फेसबुक-व्हॉॅट्स अँप वापरता येतं, मग गुगल करून आपल्याला हवी ती माहिती, हवी ती वेबसाइट का हुडकून काढता येत नाही. असं विचारलं तर उत्तर एकच, नाही जमत. आणि असेलच ना तुमच्याकडे रेडी ही माहिती. माझा ईमेल देतो तेवढी मेल करून टाका.
- ऑक्सिजन टीमला प्रश्न पडलाय की, हे असं का होतंय? म्हणजे ऑक्सिजन टीम ही सारी माहिती द्यायचंच काम आनंदानं करते आहे, पण कुणी आपल्याला आयतं रांधून वाढलं तर भरव म्हणणं, हे चुकीचं नाही का?
आपल्याला मिळालेली माहिती वाचून, समजून घेऊन, तिचं ‘अँप्लिकेशन’ करता येणं, ते कसं करायचं हे शिकून घेणं ही खरी गरज. आणि तेच खरं शिक्षण.
आपल्याला जमेल अशी एखादी वाट जर हाती आलेल्या माहितीतून हाती लागली, तर पुढची माहिती आपण मिळवायला हवी. त्यातले खाचखळगे-धोके  आपले आपण शोधून काढायला हवेत. निदान तसा प्रयत्न करायला हवा.
पण तसं न करता, नुस्ती रेडिमेड माहिती मिळवत कुणी आपल्याला आयतंच सगळं देईल असा विचार करत आयतोबा बनण्यात काय हाशिल आहे.?
प्लीज विचार करा, आमची मदत अवश्य मागा.
पण मदत म्हणजे आपण काहीच न करता, डोकं न चालवता, हातावर हात धरून बसत सगळं आयतं मागणं नव्हे.!
नाही का.?
-ऑक्सिजन टीम
 
प्लीज एवढं कराल.?
१) लेख वाचून झाला की, समजून घेऊन, त्या माहितीचा उपयोग करत आपण अधिक माहिती स्वत:ची स्वत: कशी मिळवायची हे शोधून काढण्याच्या प्रयत्न करायला हवा.
२) त्यासाठी इंटरनेट हे उत्तम माध्यम. विविध वेबसाइट कशा पहायच्या? कशा वाचायच्या? तिथून माहिती कशी मिळवायची हे शिकून घ्या.
३) आपल्याला समजलेली माहिती जवळच्या एखाद्या जाणकार माणसाकडून तपासून घ्यायला शिका.
४) आपल्या अवतीभोवती पाहत समाजात काय बदल होत आहेत, कुठली कामं गरज म्हणून निर्माण होत आहे, हे पहा. त्याचा उपयोग करता येतो का हे शिका.
५) आपले प्रश्न दुसरं कुणीतरी सोडवेल हे मनातून काढून टाकून आपण आपला कण्ट्रोल आपल्या हातात घ्यायला शिका.
६) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बुद्धिमत्ता, स्कील्स, आपला वकूब तपासून आपली करिअरची वाट निवडायचा प्रयत्न करायला हवा.
 

Web Title: You just give the number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.