शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

तुफानाला भिडण्याचं ‘वेडं’ शहाणपण..

By admin | Updated: April 7, 2017 13:06 IST

मनातली बोच असह्य झाली आणि त्यांनी अगदी छोटीशी नाव विकत घेतली. त्या नावेत बसून समुद्रामार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करायचं त्यांनी ठरवलं

मित्राचं स्वप्न पूर्ण करायला,एका छोट्याशा बोटीतूनतो निघाला जगप्रवासाला..वयाच्या पन्नाशीत पोहोचलेले एक महान प्रोफेसर खरं तर विचारवंत लेखकच. त्यांनी खूप नाव कमावलं, त्यांच्या सकस लेखनावर. त्या लेखनातल्या कसदार अनुभवांवर वाचक फि दा होते. पैसा- प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळण घेत होती, पण तरीही ते तळमळत होते. आपण जे लिहितोय ते फार वरवरचं आहे. चौकटी मोडल्याचा दावा करत आपण चौकटीतच आयुष्य जगलो याची खंत होती. मनातली बोच असह्य झाली आणि त्यांनी अगदी छोटीशी नाव विकत घेतली. त्या नावेत बसून समुद्रामार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करायचं त्यांनी ठरवलं. प्रवास सुरु झाला.सुखासुखी चाललेलं आयुष्य वाऱ्यावर सोडून ‘असं’ धाडस करणाऱ्या प्राध्यापकांचं तमाम लोकांना प्रचंड कौतुक वाटलं. इकडे समुद्री तुफानांचा सामना करत प्राध्यापक फिरत होते.एक दिवस एका तरुण मुलीनं त्यांना विचारलं..काय कमवायचंय तुम्हाला? काय सिद्ध करण्याचा अट्टहास म्हणून तुम्ही हे धाडस करताय?प्राध्यापक हसतच म्हणाले, ‘मूर्खपणा कसा असतो ते मला जगून पहायचंय; म्हणून हा अट्टाहास!’त्यानंतर प्राध्यापकांनी सांगितली त्यांची गोष्ट. ते कॉलेजात असतानाची गोष्ट. त्यांचा एक जीवाभावाचा मित्र होता. दोघंही थोडेसे सरफिरेच. त्याचं एक स्वप्न होत; एक छोट्याशा बोटीतून जगप्रवास करण्याचं. काळ बदलला. पैसा-प्रतिष्ठा लेखक होण्याची ओढ या साऱ्यात केवळ हौस म्हणून समुद्रातून जगप्रवास करण्याचं. मूर्ख धाडस प्राध्यापकांना रुचेना. या मूर्खपणाला काही अर्थ नाही, असं त्यांनी मित्राला सांगूनही टाकलं.प्राध्यापक सांगतात, ‘शहाण्यासारखं’ वागून मी खूप काही कमावलं. पण तरीही सगळ्याला कधीच भिडलो नाही, जो मुर्खपणा मला कळला, पण मी जगलो नाही तो करून पहायचाय. ज्यावेळी मी शहाण्यासारखं सुरक्षित जगत होतो. माझा मित्र एकटाच समुद्रप्रवासाला निघून गेला. एका तुफानात कायमचा हरवला. आता त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. मूर्खपणा म्हणूनच!