शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 7:00 AM

भल्या सकाळी कुणी रस्त्यांवर पळतंय, कुणी सायकलवर मांड ठोकून निसर्गाच्या कुशीत शिरतंय, कुणी बाइकवर बसून वार्‍याशी स्पर्धा करतंय, कुणी जिममध्ये जाऊन घाम गाळतंय, कुणी जंगलात जाऊन आडवाटेच्या डोंगररांगा तुडवतंय, तर कुणी ‘स्व’च्या शोधात एकटंच प्रवासाला निघतंय. कुणी पायाला दोर बांधून उंच कडय़ावरून स्वतर्‍ला फेकून देताना झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतंय, कुणी पाण्याखाली जाऊन तिथल्या नव्या जगाचा शोध घेतंय, रक्त गोठवणार्‍या थंडीत बर्फाची शिखरं कुणी पादाक्रांत करतंय, तर कुणी एखाद्या बॉलमध्ये स्वत: ला कोंडून कडय़ावरून ढकलून देतंय स्वत: ला..

ठळक मुद्देनेमकं काय आहे हे नवं जग? साहसांचं, खेळांचं, पॅशनचं आणि त्यानुसार बदलणार्‍या मानसिकतेचंही. तेच सांगणारा हा विशेष अंक..

 समीर मराठे

कल किसने देखा है?- जो भी करना है, आज, अभी, इसी वक्त. तरुणाईचा हा पॉप्युलर फंडा. आयुष्य पार बदलून टाकणारा लाइफ चेंजिंग एक्स्पेरिअन्स त्यांना कायमच हवाहवासा वाटत असतो. त्या अनुभवासाठी ते आसुसले असतात. त्या शोधातच ते असतात. त्यातून एकदा का आपली पॅशन, आवड सापडली की मग त्यासाठी अक्षरश:   काहीही करायची तारुणाईची तयारी असते.त्यांची हीच जिद्द मग वेगवेगळ्या साहसांचा पाठलाग सुरू करते. हे पॅशनच त्यांच्या जगण्याचं आणि अनेकदा साहसी खेळांचंही कारण बनतं.सचिन तेंडुलकर नेहमी म्हणतो, भारत हा खेळांवर प्रेम करणार्‍या माणसांचा देश आहे, खेळणार्‍यांचा नव्हे! मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलायला लागलं आहे. तरुण मुलांच्या जगात फिटनेस हा शब्द परवलीचा बनत चालला आहे आणि त्याचाच हात धरून आलेले काही खेळ त्यांच्या आयुष्याचा भाग बनू लागले आहेत.त्यातले काही खेळ असे आहेत, ज्यात स्पर्धा नाही, चढाओढ नाही, मात्र जिंकण्याची तुफान नशा आहे. एकेकटय़ानं खेळायचे हे खेळ असले तरी ते खेळणं सामूहिक आहे. त्या समूहाची ऊर्जा अनेकांना आपलाच नव्यानं शोध घ्यायला भाग पाडते आहे. बघा आपल्या अवतीभोवती. तेच दिसेल तुम्हाला!‘डर के आगे जित है’, हे आता नुसतं घोषवाक्य राहिलेलं नाही, एखाद्या जाहिरातीतलं पोकळ वाक्यही उरलेलं नाही तर भीतीवर स्वार होण्याची, अनाम भीतीपल्याडच्या आनंदाचा आस्वाद घेण्याची आणि त्यासाठी काहीही, अगदी काहीही करण्याची क्रेझ बनली आहे.तशीही साहसाला कुठलीच मर्यादा नाही, ना वेळेची, ना वयाची! दुनियेला आग लागो, नाहीतर जगबुडी होवो, मला जे करायचंय ते मी करणारच ही जिद्द जेव्हा मनाच्या कप्प्यात खोलवर जाऊन रुजते त्यावेळी माणसं झडझडून उठतात आणि स्वतर्‍चीच परीक्षा पाहत शारीरिक ताकदीच्या मर्यादेवर मात करत सुटतात.सध्या अनेक तरुण हेच करताना दिसताहेत. जे काही आयुष्य उपभोगायचंय ते आत्ताच, या हव्यासानं तरुणाईला झपाटलंय. तो झपाटा त्यांना घाम गाळायलाही भाग पाडतो आहे.अनेकजण स्वतर्‍लाच चॅलेंज करताहेत, ते  चॅलेंज स्वीकारण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची त्यांची खुमखुमी वाढते आहे. आपल्या ताकदीपलीकडे स्वतर्‍ला ‘पुश’ करणं अक्षरशर्‍ ढकलून देणं सुरू झालेलं आहे.नेमकं आहे काय हे सारं, याचाच शोध घेणारा आणि थेट साहसी खेळांसह मैदानावरच घेऊन जाणारा हा विशेष अंक. ही आहे एका नव्या वेडाची चटक. ते वेड खेळांचं आहे, पळण्याचं आहे, साहसाचं आहे आणि स्वतर्‍लाच ‘टेस्ट’ करून पाहण्याचंही आहे. जिद्द, पॅशन, कमिटमेन्ट, डेडिकेशन, डिव्होशन आणि रिस्क. एरवी सतत वापरले जाणारे हे शब्द, व्यसन लागल्यासारखं तरुणाईच्या रोजच्या आयुष्यात जादू भरत आहेत.ही जादू कष्ट मागते, घाम गाळायला लावते आणि परीक्षाही पाहते; पण या जादूची चटकच अशी की तिचे दीवाने न चुकता त्या जगात शिरतात आणि त्या जादूनं रंगून जातात.  या जगात मॅरेथॉन रंगतात, मैलोनमैल सायकलिंग चालतं, बाइक रायडिंग, ट्रेकिंग. यासारखे खेळ तर हजारोंना भुरळ घालताहेत.नेमकं काय आहे हे नवं जग? साहसांचं, खेळांचं, पॅशनचं आणि त्यानुसार बदलणार्‍या मानसिकतेचंही.तेच सांगणारा हा विशेष अंक..हा अंक वाचल्यावर, आळस सोडून आपणही काहीतरी करावं, झडझडून धावावं स्वप्नांच्या मागे , असं जर तुम्हाला वाटलं तर समजा, या नव्या ‘जादूनं’ आपल्यावरही गारुड केलंय..

 

sameer.marathe@lokmat.com(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्त संपादक आहेत.)