शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

थायलंडचे तरुण का भडकलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:10 PM

रस्त्यावर प्रचंड आंदोलन करत, तुरुंगात जायची तयारी करणार्‍या थाई तारुण्याचा उद्रेक.

-  कलीम अजीम

थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये हजारो युवक रस्त्यावर आहेत. सोमवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. रविवारी आंदोलकांनी मेणबत्त्या हातात घेत प्रतीकात्मक ‘फ्लॅश मॉब’ केला. वीकेण्डची रात्र हजारो मेणबत्त्यांनी उजळून गेली. प्रदर्शनात हजारो थाई नागरिक सहभागी झाले.राजेशाहीविरोधात हे आंदोलन, त्याचा चेहरा तरुण आहे. ‘रिपब्लिक ऑफ थायलंड’ असे ध्वज घेऊन तरुण आंदोलक रस्त्यावर आले. पंतप्रधानांचा राजीनामा आणि राजेशाहीवर अंकुश ठेवण्याची मागणी ते करत आहेत.सरकार आणि लोकशाही सर्मथकांत झालेल्या या संघर्षात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फेब्रुवारीपासून सरकारविरोधी आंदोलनं  सुरू आहेत. कोराना आणि लॉकडाऊन काळात शांतता होती; पण ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढली.गेल्या बुधवारी राजधानी बँकाकमध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं. ज्यात फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करत हजारो नागरिकांनी गव्हर्नमेंट हाऊसला विळखा घातला. भर पावसात छत्र्या घेऊन आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं.जनतेचा वाढता आक्रोश आणि सरकारविरोधाची लाट पाहून शासनानं देशात त्वरित आणीबाणीची घोषणा केली. निदर्शनं रोखण्यासाठी राजधानीत चारपेक्षा अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घातली. सरकारनं जाहीर सूचना  दिली, की जर रॅली काढली आणि त्याचे सेल्फी पोस्ट केले तर दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल.

‘दि गार्डियन’च्या मते, सरकारी बंदीला झुगारून रविवारी शहरातील व्हिक्टरी स्मारकात, सुमारे 10,000 लोक जमा झाले. निदर्शकांनी ‘आमच्या मित्रांना सोडा’ अशी घोषणा देत पोलिसांना ‘हुकूमशाहीचे गुलाम’ असं संबोधलं. आणीबाणीचं उल्लंघन केल्यामुळे 80 प्रमुख नेत्यांसह अनेक तरु णांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. त्यात आंदोलनाचा चेहरा बनलेल्या 36 वर्षीय पनुसाया सिथिजिरावत्तनकुल याचा समावेश आहे. पनुसायाच्या अनेक सहकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तरु णांचं हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं आहे.गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. विरोधी पक्ष असेलल्या ‘पेउ थाई’ला बहुमत मिळालं; परंतु सत्ताधारी ‘पलांग प्रयुत्त पार्टी’नं शक्तीच्या बळावर सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. मतमोजणीत गोंधळ केल्याचा सत्ताधारी पक्षावर आरोप आहे.हे तरुण आंदोलन भडकणार अशी चिन्हं आहेत.

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com