शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तरूण मुलं आज सुखी समाधानी का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 06:25 IST

तरुण मुलांकडे आज साधनं आहेत;पण स्वास्थ्य नाही. ते कनेक्टेड आहेत; पण स्वत:पासून तुटलेत, असं का?

-प्रा. मधुकर चुटे

आजच्या प्रचंड वेगवान युगामध्ये जेवढी भौतिक सुखं प्राप्त होतात, तशाच अनेक समस्याही वेगाने तयार होतात. त्यातलाच एक भाग म्हणजे आजच्या तरुणाईचा असा समज झाला आहे, की विज्ञान-तंत्नज्ञान हीच आपल्या सुखाची किल्ली आणि दु:खावर मात्रा आहे.  हे अगदीच खरं आहे की, तंत्रज्ञानामुळे आज तरुणाईचे कष्ट कमी झालेत. किंवा कमी कष्टात भरपूर पैसा आणि सुविधांचं सुख मिळू लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आज तरुण अनेक संकटांवर मात करू शकतात. सगळं जगच खूप जवळ आलं आहे. एकाच ठिकाणी बसून आपली अनेक कामं करणं सहज शक्य झालं आहे. पण मग असं असूनही ही तरुण मुलं मनापासून सुखी किंवा समाधानी का वाटत नाहीत? करिअर, उत्तम पगार एकीकडे कमावणारे अनेकजण आहेत; पण त्यापायी त्यांची जीवनशैलीसुद्धा बदलते आहे. पैसे आहेत, अनेक प्रकारची सुखसाधनं आहेत; पण मानसिक समाधान नाही. अनेक लाइफ स्टाइल डिसीज अर्थात आजार तारुण्यातच जवळ येत आहेत, ते का? याचाही तरुणांनी विचार करायला हवा. ताण-तणावाचा आणि धावपळीचा परिणाम आजच्या तरु ण वर्गावर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतोय. जे आजार किंवा व्याधी साठाव्या वर्षी येऊ शकतात त्या तीस ते चाळीसव्या वर्षीच तरुणांवर आक्रमण करीत आहेत. हे असं होण्यामागची कारणं काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, अनेक तरुणांना भेटतो, त्यातून मला या काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. 

1) मोठय़ा पगाराच्या नोकरीसाठी वाट्टेल तितका वेळ काम करावं लागते. कोणत्याही व्यक्तींची काम करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता ठरलेली असते. म्हणजे जास्तीत जास्त आठ ते दहा तास काम करणं कोणालाही सहज शक्य होतं; परंतु आज बारा ते सोळा तास एवढं काम अनेकजण करतात. याशिवाय घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर बसून उरलेली कामं करावी लागतात. ऑफिसच्या कामासाठी करावा लागणा-या प्रवासाची तयारी ठेवावी लागते. 

2. आज बाविसाव्या किंवा तेविसाव्या वर्षी नोकरीला लागलेला तरुण किंवा तरुणी पुढच्या दहा वर्षांमध्ये याच पद्धतीने सोळा-सोळा तास काम सतत करत असतात. म्हणजे वयाच्या तीस-पस्तीसाव्या वर्षी त्यांची शारीरिक आणि  मानसिक क्षमता कमी होऊ लागते. ही मुलं एक्झॉस्ट किंवा बर्न आउट झाल्यासारखी दिसतात. होतातही. 

3. नैराश्य किंवा एकटेपणा हीदेखील एक मोठी समस्या ठरत आहे. कारण आजच्या सगळ्या या आधुनिक जीवनशैलीमुळे  तरुणवर्ग सतत इंटरनेट किंवा मोबाइलच्या संपर्कात असतो. चोवीस तासांपैकी त्याचे सहा ते आठ तास हे मोबाइल किंवा इंटरनेटमध्येच खर्च होत असतात. याचा परिणाम असा होतो की आजच्या  तरुणाईकडे स्वत:साठी कोणताही वेळ उरत नाही. कारण या दोन्ही गोष्टींमुळे ते आपल्या मित्रांशी बोलत राहतात. सोशल नेटवर्किंगमुळे काही ना काही चर्चा करत राहतात. परंतु आपल्या मनाला किंवा मेंदूलासुद्धा थोडावेळ ते विश्रांती देऊ शकत नाही. इतरांशी मोबाइलवरून गप्पा मारण्यातच त्यांचा वेळ जात असतो. मग त्यांच्याकडे स्वत:साठी कोणताच वेळ उरत नाही. या सगळ्या आकर्षणामुळे तरुणवर्ग त्यांच्या घरातील लोकांशीसुद्धा संपर्कात राहत नाही, संवादही होत नाही. मग रिकामं मन त्यांना सतत अस्वस्थ करत राहते. 

4. हायपर टेन्शन , डिप्रेशन किंवा हृदयरोग यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसते. देशातील तरुणाई तरु ण वयात जर अशा अकाली आजारांना बळी पडली तर ते देशासाठी मोठंच नुकसान म्हणावं लागेल. हे सारं  गंभीर आहे. तेव्हा तरुण मुलांनी जरा स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार केलेला बरा. 

( लेखक नागपूरस्थित महाविद्यालयात व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख आहेत.)