whom are you dating? A human or an onion??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:51 PM2018-08-09T16:51:38+5:302018-08-09T16:58:31+5:30

आपण प्रेमात नाही तर अब्यूजिव्ह रिलेशनशिपमध्ये आहोत आणि प्रेमाच्या नावाखाली बळी जातोय हे कसं ओळखायचं?

whom are you dating? A human or an onion ??- are you in a abusive relationship? | whom are you dating? A human or an onion??

whom are you dating? A human or an onion??

Next
ठळक मुद्दे होस्टेलवर जाऊन तिनं त्याची रूम आवरणं, भांडी घासणं, कपडे धुणं, त्याच्या मित्रांसमोर अपमान सहन करणं, बळजबरी दारू किंवा सिगारेट प्यायला लागणं, मारहाण, शिवीगाळ, नग्न व्हिडिओ/फोटोंची सतत मागणी, नाजूक क्षणांचा आग्रह किंवा त्याचं शूटिंग यासह अनेक गोष्टी घआनंद मिळवण्यासाठी प्रेमाच्या आणाभाका घेऊन ज्याची सुरुवात झाली ते नातं उद्ध्वस्त कसं करतं? आणि तसं होत असेल तर त्यातून बाहेर पडता येतं का? कसं बाहेर पडायचं?

- गौरी पटवर्धन

फ्रेण्डशिप डे ते व्हॅलेण्टाइन्स डे या सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक उलथापालथी घडतात. प्रपोजल्स प्लॅन केली जातात, मित्नमैत्रिणींच्या मार्फत सेटिंग्ज केली जातात, आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीने आपल्याला ‘हो’ म्हणावं यासाठी तर्‍हेतर्‍हेने प्रयत्न केले जातात. शेवटच्या आठ-पंधरा दिवसात प्रपोज करण्यासाठी लागणारा धीर गोळा केला जातो आणि शेवटी एकदाचं ते प्रपोजल ‘त्या’ व्यक्तीसमोर मांडलं जातं.  अनेकवेळा ते स्वीकारलंही जातं.
ज्या दोघांनी एकमेकांकडे प्रेमाचा ‘इजहार’ केलेला असतो ते त्यानंतर जमिनीपासून चार बोटं वर चालणार, सतत एकमेकांबरोबर राहणार, इतर ग्रुपला टाळून दोघंच कुठेतरी भटकायला जाणार, एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करत राहणार, त्यांच्या आवडीनिवडी बदलणार, राहणीमान बदलणार, त्याच्याबरोबर ती आणि तिच्याबरोबर तो सगळीकडे कॉम्प्लिमेंटरी येणार असं सगळं त्या दोघांनी आणि इतरही सगळ्यांनी गृहीत धरलेलं असतं.
हे सगळं ज्यांच्या वाटय़ाला येतं, त्यांच्याकडे इतर ‘सिंगल्स’ अनेकदा असूयेनं बघतात. त्यांनाही ते सगळं हवंहवंसं वाटतं. पण बाहेरून बघताना अनेकदा हे लक्षातच येत नाही की त्या दोघांमध्ये सगळं  ‘ऑल वेल’ नाही. काही वेळा अगदी जवळच्या मित्नांच्या मैत्रिणींच्या ते लक्षात येतं; पण नेमकं काय चुकतंय यावर त्यांनाही बोट ठेवता येत नाही. वर वर पाहता सगळं छान असतं. पण ती प्रेमात पडलेली व्यक्ती आनंदात मात्न दिसत नाही. ती सतत टेन्शनमध्ये असते, सतत काळजीत असते, सतत बावरलेली असते, जरा मोबाइल वाजला की दचकते, इतर ग्रुपपासून फटकून राहायला लागते, मित्नमैत्रिणींना टाळायला लागते. कुठंतरी काहीतरी चुकतंय हे नक्की असतं; पण ते नेमकं काय ते मात्न समजत नाही. मित्नमैत्नणींना वाटतं की प्रेमात पडल्यामुळे आपला मित्न/मैत्नीण आपल्यापासून दूर गेली. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी असते की तो दूर गेलेला मित्न /मैत्नीण एकटे पडलेले असतात. काहीतरी चुकतंय हे त्यांनाही कळत असतं; पण काय चुकतंय ते मात्न कळत नसतं.
ज्या नात्यातून आपलं जग आनंदाने, प्रेमाने भरून जाईल असं वाटलेलं असतं, त्या नात्याचाच काच व्हायला लागलेला असतो, असा काच वाटणं नॉर्मल आहे का ते समजत नाही, त्यातून बाहेर पडावं की नाही ते कळत नाही, बाहेर पडावंसं वाटलं तरी ते कसं करायचं ते माहिती नसतं.
आणि मग असे अनेकजण/अनेकजणी अशा काचणार्‍या नात्यांच्या- म्हणजेच अब्युजिव्ह रिलेशनशिप्सच्या गर्तेत खोल खोल फसत जातात. त्यात मुली असतात, तशी अनेकदा मुलंही असतात. अब्यूज करणारी, छळ करणारी व्यक्ती पुरु ष असू शकते तशी स्त्नीही असू शकते. दोघांच्या छळण्याच्या प्रकारांमध्ये फरक असेल; पण त्यांच्याशी नातं ठेवणार्‍या माणसाचं मात्न नुकसानच होत असतं.
पण ही ‘काचणारी नाती’ मोठी चमत्कारिक असतात. ती सहन होत नाहीत, शेअर करता येत नाहीत,  त्यातून सहजासहजी बाहेरही पडता येत नाही. या नात्यांमध्ये काय नसतं? मानसिक छळ असतो, शारीरिक मारहाण असते, शिवीगाळ असते आणि हे सगळं फक्त प्रेमाची कबुली दिल्यावर, आपलं एकमेकांवर जिवापाड वगैरे प्रेम आहे मान्य केल्यावर सुरू झालेलं असतं. त्यामुळे त्यात अडकलेली व्यक्ती विचित्न कात्नीत सापडलेली असते. एकीकडे जिच्या प्रेमात पडलोय असं वाटतं ती व्यक्ती आपला छळ करत असते,  दुसरीकडे हे सगळं घरच्यांपासून लपून-छपून करण्याचं प्रेशरही असतं.
त्यात पूर्वी तरी प्रेमात पडलेली माणसं घरी गेल्यानंतर तरी स्वतंत्न असायची. पण आता मात्न घरी गेल्यानंतरही, अक्षरशर्‍ 24 तास मोबाइलवरून एकमेकांवर वॉच ठेवणं चालू असतं. त्याचं प्रेशर वाढत जातं,  एक वेळ अशी येते की हे नातं जर संपलं नाही तर आयुष्य संपवावं, असं वाटायला लागतं.
का होतं असं? अगदी होस्टेलवर जाऊन तिनं त्याची रूम आवरणं, भांडी घासणं, कपडे धुणं, त्याच्या मित्रांसमोर अपमान सहन करणं, बळजबरी दारू किंवा सिगारेट प्यायला लागणं, मारहाण, शिवीगाळ, नगA व्हिडीओ/फोटोंची सतत मागणी, नाजूक क्षणांचा आग्रह किंवा त्याचं शूटिंग यासह अनेक गोष्टी घडतात तेव्हा ते प्रेम असतं का? आनंद मिळवण्यासाठी प्रेमाच्या आणाभाका घेऊन ज्याची सुरुवात झाली ते नातं माणसाला उद्ध्वस्त कसं करतं? त्यातून बाहेर पडता येतं का? कसं बाहेर पडायचं? असे अनेक प्रश्न या काचणार्‍या नात्यांच्या कात्नीत अडकलेल्या मित्न-मैत्रिणींना छळतात. त्याची उत्तरं शोधण्याचा हा एक प्रयत्न..
मात्र उत्तरांच्या दिशेनं जाताना हे वाक्य सोबत ठेवा.
 If you are dating someone and you are constantly crying, you should ask yourself, whom are you dating? A human or an onion?
****

अब्यूजिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय?

*ज्यात आनंद नसून समोरच्या व्यक्तीची भीती मोठी असते. 
*आधार नसून मालकी असते.
*धाक असतो.
* जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे.
* इतरांशी असलेली नाती तोडण्याचा आग्रह असतो.
* शिवीगाळ सर्रास केली जाते.
* मारहाण होते.
* सतत संशय घेतला जातो.
* सतत लक्ष ठेवलं जातं.
* शारीरिक संबंध हत्यार म्हणून वापरली जातात. (मनाविरु द्ध शारीरिक जवळीक करणं आणि समोरच्याला ‘शिक्षा’ म्हणून शारीरिक जवळीक टाळणं ही दोन्ही याचीच रूपं आहेत.)
* समोरच्या व्यक्तीला ‘शिक्षा’ म्हणून ‘कोरडं वागणं’ आणि ‘बक्षीस’ म्हणून ‘प्रेमाचा वर्षाव करणं’ हे सतत आलटून पालटून होत राहतं.
* एकतर्फी प्रेम असणं ते दटावत राहणं.


सहन करण्याची कारणं काय?

* आपण अब्यूजिव्ह रिलेशनशिपमध्ये आहोत हे लक्षातच येत नाही.
* समोरच्या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून असं वागतो/वागते असं वाटतं. हक्क गाजवणं, मारहाण करणं, सतत जाब विचारणं हे समोरची व्यक्ती प्रेमापोटी/काळजीपोटी करते असं वाटतं. किंवा तसा समज करून दिला जातो.
* घरात आणि समाजात तेच बघितलेलं असल्यामुळे तेच नॉर्मल आहे असं वाटतं. किंवा आपण यातून बाहेर पडलो तरी इतर लोकांना ते समजणार नाही आणि ते आपल्यालाच दोष देतील असं वाटतं.
* बाहेर पडायची इच्छा झाली तरी हिंमत होत नाही कारण अ‍ॅब्यूज करणारी व्यक्ती जोडीदाराला अनेक प्रकारे धाकात ठेवते. त्याच्याच धाकाने अनेकदा आधीची नाती तोडलेली असतात. घरी इतकं मोकळं वातावरण नसतं त्यामुळे घरचे समजून घेणार नाहीत असं वाटतं. समोरच्या व्यक्तीने दिलेली धमकी खरी केली तर आपण काय करायचं हे लक्षात येत नाही. त्या भीतीपोटी नातं कंटिन्यू केलं जातं. 
* ही नाती जरी निगेटिव्ह असली तरी इमोशनली खूप इंटेन्स असतात. त्या नात्याची सवय झालेली असते. इतरांना आपलं परस्परांवर किती प्रेम आहे हे दाखवलेलं असतं, एकटेपणाची भीती वाटते. त्यामुळेही त्या नात्यातून बाहेर पडता येत नाही किंवा बाहेर कसं पडायचं हे समजत नाही.
* नात्यातून बाहेर पडल्यावर आपलं आपल्याला काही करता येईल हा आत्मविश्वास गमावलेला असतो.
* खूप काळ अशा नात्यात राहिलेली व्यक्ती स्वत्व आणि स्वओळख विसरून बसते. नव्यानं काही सुरू करण्याची उमेद हरवून बसते.
* सल्ला देणारे मित्रमैत्रिणीपण अनेकदा अर्धवट वयाचे असतात. तेही अ‍ॅडजस्ट करण्याचा सल्ला देतात.
* ब्रेकअपचे मानसिक ताणतणाव सहन करण्यापेक्षा आहे ते बरं आहे असं वाटतं.
* ‘मी अजून अमुक केलं तर सगळं चांगलं होईल, असं वाटतं.’
* अब्यूजिव्ह रिलेशनशिपचा पॅटर्न जनरली असा असतो की अब्यूजिव्ह वागण्यापाठोपाठ लगेच प्रेमाचं प्रदर्शन असतं, सॉरीच्या आणाभाका असतात, गिफ्ट्स असतात. त्यामुळे व्हिक्टीमला असं वाटतं की अ‍ॅब्यूज करणार्‍या व्यक्तीला स्वतर्‍ची चूक समजली आहे. मग कशाला नात्यातून बाहेर पडायचं? पण हे दुष्टचक्र  असतं. दर काही दिवसांनी एकदा वाईट वागणं - त्याची भरपाई केल्यासारखं करणं असंच चालू राहतं.
* ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या, होस्टेलवर राहणार्‍या मुली होमसिक होऊन आधार शोधायला जातात आणि अशा नात्यांमध्ये फसतात. त्यातून इमोशनली बाहेर पडून परत येणार एकटेपणा जास्त भीतिदायक वाटतो.
* बदनामीची भीती तर असतेच. त्याचा पुरेपूर वापर अब्यूज करणारा जोडीदार करून घेतो.
* ‘तू सोडून गेलीस तर मी जीव देईन’ अशी भीती सर्रास घातली जाते आणि त्याला बळी पडून व्हिक्टीम नातं कंटिन्यू करते.
* ‘तू सोडून गेलीस तर मी इतर कोणाशीच कधी लग्न करणार नाही, माझा प्रेमावरचा, चांगुलपणावरचा विश्वास उडेल’ अशा धमक्या दिल्या जातात. 
* ‘मला सोडून गेलीस तर कशी जगतेस ते मी बघतोच’ अशा धमक्या दिल्या जातात. आपण खरंच ब्रेकअप केलं तर समोरची व्यक्ती काय करेल याचा अंदाज येत नाही. ती व्यक्ती आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना मारहाण करेल, बदनामी करेल अशी भीती वाटते जी काहीवेळा खरी असू शकते.
* दुसर्‍याशी नातं ठेवलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करीन कारण मी इतर कोणासोबत तुला पाहू शकत नाही अशी धमकी दिली जाते. 


आपण अ‍ॅब्यूजिव्ह रिलेशनशिपमध्ये आहोत
हे कसं ओळखाल?  

* सतत सगळीकडे बरोबर जाण्याचा आग्रह धरणं. जिथे बरोबर जाता येणार नाही त्या गोष्टी जोडीदारानं सोडून द्याव्यात, असा आग्रह धरणं किंवा त्या सोडून द्यायला भाग पाडणं.
* जिथे बरोबर जाऊच शकत नाही तिथे सतत संपर्कात राहणं. कायम ताबडतोब उत्तर मिळण्याची अपेक्षा करणं.
* जर फोन उचलला नाही तर तू कुठे होतीस, फोनला उत्तर का नाही दिलंस यावरून धारेवर धरणं. 
* फोन बिझी लागला तर कोणाशी बोलत होतीस म्हणून जाब विचारणं.
* कपडे कुठले घाल/घालू नको याबद्दल सतत सूचना करणं. ‘मी म्हणेन तसेच कपडे घातले पाहिजेत’, असा आग्रह धरणं. 
* केस काप/वाढव याबद्दल आग्रही असणं.
* एकूणच दिसण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर वर कंट्रोल ठेवणं. मेकअप करायचा का नाही इथपासून ते हाय हिल्स घालायच्या का नाही इथर्पयत सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायला लावणं आणि या सगळ्याला ‘तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय’ असा मुलामा देणं.
* तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर. असं सतत म्हणून मनाविरु द्ध गोष्टी करायला लावणं.
* प्रेम सतत सिद्ध करत राहायला लागणं.
* कम्युनिकेशन हत्यार म्हणून वापरणं - अबोला धरणं, चारचौघात अपमानास्पद बोलणं, चारचौघात गोड बोलून एकांतात सतत अपमान करणं.
* सतत मत्सर वाटणं. फोन तपासणं जे काही वाईट घडतंय/घडलंय ते इतर कोणामुळे तरी/तुझ्यामुळे आहे असा फील देत राहणं.
* ‘मुलगा’ किंवा ‘मुलगी’च्या कुठल्यातरी भ्रामक चौकटीत समोरच्या व्यक्तीला सतत राहायला भाग पाडणं.
* ‘मला राग येतो’ असं न म्हणता ‘तू मला चिडायला भाग पाडतेस’ असं म्हणून व्हिक्टीमला अपराधी वाटायला लावणं.
* जोडीदारालापण काही मत असू शकेल याची शक्यताही गृहीत न धरणं.
* गंभीर शारीरिक मारहाण, मानसिक छळ, लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक
आणि टोक म्हणजे मुलीला पूर्ण स्वतर्‍च्या कह्यात आणून शेवटी तिची मानवी तस्करी करणं.

या नात्यातून बाहेर कसं पडता येईल?

प्रेमात पडताना आधी समोरच्या माणसाचं खरं रूप दिसत नाही. आणि एकदा नातं स्वीकारल्यानंतर ते रूप दिसलं तरी बाहेर पडता येत नाही. काही वेळा व्यक्तीच्या वागण्यातून ती अब्यूजिव्ह, कंट्रोलिंग आहे याची काही लक्षणं दिसत असतात; पण त्याकडे प्रेमाच्या धुंदीत दुर्लक्ष केलं जातं. सुरु वातीला हे सतत कंट्रोल करणं, सगळीकडे बरोबर जाणं हे छान वाटतं, नंतर त्याचा काच वाटतो. मात्र एकदा लक्षात आलं की, आपला छळ होतोय, काहीतरी गडबड आहे तर वेळीच त्यातून बाहेरही पडायला हवं. 
* हे ‘असं’ नातं असण्यात तुमची काहीही चूक नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते सहन करून नका.
* समोरच्या व्यक्तीने आपल्या प्रत्येक गोष्टी कंट्रोल करणं, सतत लक्ष ठेवून राहणं, आपल्याला दडपणाखाली ठेवणं हे नॉर्मल आणि चांगल्या नात्याचं लक्षण नाही. अशा नात्यात जाण्याची चूक तुम्ही केली असेल म्हणून आता ते आयुष्यभर सहन करायची गरज नसते हे स्वतर्‍ला समजावून सांगा.
* हे नातं अनेकदा आपलं भाविनक आयुष्य व्यापून टाकणारं असतं. त्यातून बाहेर पडल्यावर अचानक मोठी पोकळी तयार होते. त्याच्याशी डील कसं करायचं याचा विचार आधीच करून ठेवा. आपलं मन गुंतवण्यासाठी आपल्याला आवडणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीजचा विचार आणि प्लॅनिंग करून ठेवा.
* त्या नात्यात गुंतण्याआधी आपण कसे होतो ते आठवा. त्यावेळी तुम्ही ज्या गोष्टी एकटय़ाने करू शकत होतात त्या सगळ्या अजूनही करू शकता. मधल्या काळात आपल्या सवयी बदलल्या होत्या, क्षमता कमी झाल्या नव्हत्या हे स्वतर्‍ला सांगा.
* ‘‘आपण आपल्या वागण्यात बदल केला तर समोरची व्यक्ती बदलेल’’ असं वाटणं हा सापळा आहे. मुळात जो प्रॉब्लेम तुमच्या वागण्यामुळे निर्माणच झालेला नाही, तो तुमच्या वागण्यामुळे सुटू शकत नाही.
* काही वेळा असं वाटतं, की अब्यूजिव्ह व्यक्तीला मदतीची गरज आहे. ते खरंही असू शकतं. अशा वेळी त्या व्यक्तीला मदत मिळवून द्या. पण त्यासाठी आपण स्वतर्‍चा बळी देऊन त्या नात्यात सगळं सहन करत बसायची गरज नाही. 


मदत कुठे मिळू शकते?

* महिला संघटना, काउन्सिलर, मानसोपचार तज्ज्ञ, पोलीस सेल, सायबर सेल, मित्न-मैत्रिणी, शिक्षक, विद्यार्थिनी मंच, पालक यांची मदत तुम्ही घेऊ शकता. 
* अठरा वर्षाखालील व्यक्तीचा शारीरिक - लैंगिक छळ होत असेल तर पॉक्सो कायद्याखाली मदत मागता येते.
* या किंवा इतर कुठल्याही कारणाने बलात्कार पीडित मुलगी/महिला असेल तर शासनाच्या मनोधैर्य योजनेखाली मदत मिळते.
* तुमचे फोटो, माहिती तुमच्या परवानगीशिवाय व्हायरल करणं हा सायबर लॉखाली गुन्हा आहे.
त्यावरून ब्लॅकमेल केलं जात असेल तर कायद्याची मदत घ्या.


प्रेमात आहात?
- मग ‘हे’ सांभाळा.

* इंटिमेट फोटो शेअर करू नका. ही फार बेसिक सूचना वाटते; पण ही चूक एकदा केल्यामुळे त्या नात्यातून बाहेर पडता येत नाही असं खूप वेळा घडतं.
* बोला - मदत मागा. अ‍ॅब्यूजिव्ह नात्यातून बाहेर पडणं बाहेरून दिसतं तेवढं सोपं नसतं. पण मदत घेऊन त्यातून बाहेर पडता येतं.
* आपलं नातं कुठल्या दिशेला जातंय हे ओळखा. हे नातं अब्यूजिव्ह आहे असं वाटत असेल तर वेळीच त्यातून बाहेर पडा. आपण अजून प्रयत्न केले तर समोरच्याचं वागणं बदलेलं असं वाटणं हा सापळा आहे. त्यात फसू नका. 
* एकाकी जागी भेटायला बोलावलं तर सावध व्हा. कन्स्ट्रक्शन साइट्स, गावाबाहेरची निर्जन ठिकाणं अशा ठिकाणी भेटणं टाळा.
* नात्यातल्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा. ‘‘आत्ता नको’’ असेल तर तसं स्पष्ट सांगा. ‘‘हे कधीच नको आहे.’’ असं कुठल्या गोष्टीबद्दल वाटत असेल तर स्पष्ट सांगा. समोरची व्यक्ती जर खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तुमचा चॉईस, प्रेफरन्स, निर्णय याबद्दल तिने आदर बाळगला पाहिजे.
* कोणी जर नात्यात ‘फार पटकन’ ‘फार पुढे’ जायचा प्रयत्न करत असेल तर सावध व्हा. समोरची व्यक्ती घाई करते म्हणून तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्याची गरज नाही. आणि नाही म्हटलं म्हणजे आपलं प्रेम खरं नाही, विश्वास नाही वगैरे भावनिक जाळ्यात फसू नका. नातं दोन्ही बाजूंनी असतं. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या स्पीडने आणि तेवढंच पुढे जा.
* आपल्या महत्त्वाच्या वस्तू - आय कार्ड्स, बँकेचे पेपर्स, लायसन्स असलं काहीही समोरच्या व्यक्तीकडे ठेवायला देऊ नका. आधी दिलं असेल तर संधी साधून, गोड बोलून त्या वस्तू आपल्या ताब्यात घ्या. तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी या वस्तू वापरल्या जाऊ शकतात.
* एका सो कॉल्ड प्रेमाच्या नात्यासाठी इतर मित्न-मैत्रिणींशी असणारे संबंध तोडू नका. ‘त्या’ व्यक्तीच्या सांगण्यावरून आई-वडिलांशी भांडू नका. 
* प्रेमात कितीही बुडाल्यासारखं वाटत असेल, तरी ‘स्वतर्‍चा’ वेळ राखून ठेवा. सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत करण्याची गरज नसते. या ‘स्वतर्‍च्या’ वेळात तुम्हाला तुमच्या नात्याकडे तटस्थपणे पाहता येऊ शकतं.

Web Title: whom are you dating? A human or an onion ??- are you in a abusive relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.