शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आपण कोण आहोत? माणसं की गोष्ट?

By admin | Updated: April 19, 2017 15:43 IST

खांदे - कोपर आणि मनगटं काटकोनात वाकवून. सोनेरी पदराची गडद निळसर साडी. पदर कमरेत खोवून नेसली आहे.

 - प्रसाद सांडभोर

हिरवा - पिवळा - लाल. काउंटर सुरू.१५०१४९१४८आता आजची पुढची दोन मिनिटं या सिग्नलवर. सकाळची वेळ. गाड्या, बस, ट्रक - गर्दीच गर्दी. त्यात अधूनमधून चालणारी माणसं. या कोण आजीबाई येताहेत डावीकडून? केवढी मोठी टोपली आहे त्यांच्या डोक्यावर?काय माहीत काय घेऊन चालल्याहेत! टोपली किती मस्तपैकी धरलीये.खांदे - कोपर आणि मनगटं काटकोनात वाकवून. सोनेरी पदराची गडद निळसर साडी. पदर कमरेत खोवून नेसली आहे. पायांतल्या कातडी चपला चालून चालून झिजून गेल्यात. अशी टोपली डोक्यावर घेऊन चालणं नेहमीचं काम असावं त्यांचं. अगदी रोजचं सवयीचं दिसतंय. किती आरामात रस्ता ओलांडताहेत त्या. सिग्नल सुटेल म्हणून भीती, घाई बिलकुल नाही. उलट एक वेगळीच लय आहे त्यांच्या चालण्यात.मनातल्या मनात कोणतं बरं गाणं गुणगुणत असतील? टोपलीत पांढरी फुलं आहेत वाटतं.हो, मोगऱ्याची फुलं! सुगंध येतोय केवढा मस्त! टोपलीखाली पांढऱ्याशुभ्र केसांचा अंबाडा बांधलाय. त्याभोवती एक मोगऱ्याचा गजरा. ओह, आजीबाई नुस्ती फुलं नव्हे - मोगऱ्याचे गजरे विकायला घेऊन चालल्या आहेत! कुठून बरं आणत असतील इतकी फुलं? फुलबाजारातून की बागेतून? एकटीनं इतके गजरे ओवत असतील? घरी कोणी असेल मदतीला? कुठे बरं राहत असतील? कधीपासून गजरे विकत असतील? अजून काय काय करत असतील? काय असेल आजीबार्इंची गोष्ट? आजीबाई स्वत:च गोष्ट आहेत मुळी. सिग्नलवर सापडलेली दोन मिनिटाची गोष्ट. नुसत्या आजीबाईच का?ही शेजारची स्कूटीवरची हेल्मेट घातलेली मुलगी, बसच्या दारात उभा कंडक्टर, हा रिक्षावाला, मी स्वत: प्रत्येकजण एकेक गोष्ट आहे. आपण नक्की आहोत कोण? माणसं? की गोष्ट? माणसं काय येतात आणि जातात. गोष्टी मात्र कायम राहतात. गोष्ट असण्यात जास्त गंमत आहे. तीन, दोन, एक. हिरवा. सिग्नल सुटला. चला...